नेर्ले येथे दिवसभर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:08+5:302021-05-06T04:28:08+5:30
फोटो ओळ- नेलेॅ (ता. वाळवा) येथील नेहमी गजबजलेल्या बाजार पेठेत बुधवारी शुकशुकाट होता. लोकमत न्यूज नेटवर्क नेलेॅ : नेलेॅ ...
फोटो ओळ- नेलेॅ (ता. वाळवा) येथील नेहमी गजबजलेल्या बाजार पेठेत बुधवारी शुकशुकाट होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेलेॅ : नेलेॅ (ता. वाळवा) येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपासून जनता कर्फ्यू व संपूर्ण सांगली जिल्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली. बुधवारी पहिल्या दिवशीच नेर्ले येथील गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये शांतता होती. नागरिक व व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह केलेल्या दंडात्मक कारवाईने रस्ते निर्मनुष्य होते. ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने गावात येणारे सर्व रस्ते रोखले असून चेक पोस्ट बसवले आहेत. या चेक पोस्टवर ग्रामपंचायत कर्मचारी व खासगी सुरक्षारक्षक बंदोबस्तासाठी तैनात आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांची चौकशी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.