वाळव्याचा भावई उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:39+5:302021-07-10T04:19:39+5:30
वाळवा : येथील आराध्य ग्रामदेवता श्री अंबामाता देवीच्या दोन्ही बाजूंना दोन मुखवटे ठेवून पुजाऱ्यांनी पूजा विधी केल्यानंतर वाळवा ...
वाळवा : येथील आराध्य ग्रामदेवता श्री अंबामाता देवीच्या दोन्ही बाजूंना दोन मुखवटे ठेवून पुजाऱ्यांनी पूजा विधी केल्यानंतर वाळवा भावई उत्सव सण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला.
सलग पाच दिवस भावई उत्सव सण साजरा केला जातो. प्रथेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण अमावास्येदिवशी गावाच्या मध्यभागी असलेल्या अंबामाता मंदिरातून सूर्योदयापूर्वी मुखवटे पूजाविधी करून बाहेर पडून पहिली धाव घेतात. हा सर्व देवी, दैत्याचा शोध घेण्याचा खेळ दोन वर्षे सलग ठप्प झाला आहे.
परंतु, दिवा काढणे व नवीन पुरणे हा कार्यक्रम काळा मारूती मंदिर येथील बारा बलुतेदार यांच्या उपस्थितीत झाला. गेल्यावर्षी पुरलेला दिवा ओला निघाला शिवाय यामध्ये जानवे आढळले. यामुळे यापुढे यावर्षी पाऊस खूप पडणार, हे नक्की आहे. याबरोबर होणारे घोडी, पिसे, जोगण्या, लोट, मुखवटे व पाखरे उडविणे हे सर्व कार्यक्रम शासकीय आदेशानुसार रद्द करण्यात आले आहेत.