चिंब उत्साहात कोरडी रंगपंचमी

By admin | Published: March 28, 2016 11:45 PM2016-03-28T23:45:31+5:302016-03-29T00:28:44+5:30

मनसोक्त रंगांची उधळण : सांगलीच्या तरुणाईने ठेवले दुष्काळाचे भान

Dry pompous with chimpanzee enthusiasm | चिंब उत्साहात कोरडी रंगपंचमी

चिंब उत्साहात कोरडी रंगपंचमी

Next

सांगली : उन्हाचा चढत चाललेला पारा आणि त्यासोबतीला रंगांची अपार उधळण करत सोमवारी शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाविद्यालय परिसरात तरुण-तरुणींचा मोठा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात बहुतांश ठिकाणी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
होळीनंतर आठवडाभरातच आलेल्या रंगपंचमीला दोनवेळा रंगांची उधळण करण्याची संधी शहरवासीयांना मिळाली. आपल्याकडे होळीला रंग खेळला जात नसल्याने सर्वांना रंगपंचमीची प्रतीक्षा होती. सकाळपासूनच शहरात रंगपंचमीला सुरुवात झाली. यंदा रंगांच्या उधळणीबरोबर पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यात आला असला तरी कोरड्या रंगांची अक्षरश: पोती घेऊन तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होते. परिचिताला गाठून त्याला रंगात न्हावू घालण्यात येत होते. रंगांच्या उधळणीबरोबरच शहरातून मोटारसायकलवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र, पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केल्याने मर्यादित स्वरुपात तरुणांनी हुल्लडबाजी केली.
शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालय परिसरात दिसून आला. शहरातील सर्वच महाविद्यालयांचे रस्ते अक्षरश: रंगाने माखून गेले होते. रंगांची उधळण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. युवतींचे अनेक गटही वाहनांवरून रंगांची उधळण करीत फिरताना दिसत होते. दुपारनंतर रस्ते ओस पडले असले तरी सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता. (प्रतिनिधी)

नैसर्गिक रंगांच्या वापराला प्राधान्य
यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी कोरडी रंगपंचमी साजरी केली. त्यातही रासायनिक रंगांपासून डोळे आणि शरीराला होणारे अपाय लक्षात घेता रासायनिक रंगांचा वापर टाळण्यात आला होता. दरवर्षी आॅईल पेंटचाही वापर होत असे. मात्र, यंदा याचा वापर झाला नाही. याऐवजी पावडर रंग आणि त्यातही बाजारात उपलब्ध असलेले नैसर्गिक रंग वापरण्याला प्राधान्य देण्यात आले होते.

ंसांगल्ांीच्या अनेक भागात पाणीपुरवठा बंदपाण्याची संभाव्य नासाडी टाळण्यासाठी महापालिकेने सोमवारी अनोखे पाऊल उचलले. शहराच्या गावठाणासहीत अनेक विस्तारित भागातील पाणीपुरवठा सकाळपासून बंद ठेवला. सायंकाळी चारनंतर त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे रंगपंचमीनिमित्त पाण्यात तसेच ओल्या रंगात चिंब न्हाऊन जाण्याच्या अनेकांच्या इच्छेवर पाणी पडले.

Web Title: Dry pompous with chimpanzee enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.