वाळवा - शिरगाव मंजूर पुलाचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:02+5:302021-07-30T04:28:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वाळवा - शिरगाव पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी विरोधी ...

Dry - Start work on Shirgaon sanctioned bridge | वाळवा - शिरगाव मंजूर पुलाचे काम सुरू करा

वाळवा - शिरगाव मंजूर पुलाचे काम सुरू करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वाळवा - शिरगाव पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली. वाळवा सरपंच डाॅ. शुभांगी माळी व शिरगावच्या सरपंच दीपाली शिंदे यांनी याबाबतचे निवेदन फडणवीस यांना दिले.

फडणवीस हे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी वाळव्यात आले होते. या निवेदनात म्हटले आहे की. भाजपच्या सत्ताकाळात वाळवा - शिरगाव पुलाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. हा पूल मूळ प्रस्तावाप्रमाणे वाळवा कोटभाग ते शिरगाव असाच व्हावा. प्रस्तावात बदल करून वाळवा हाळभाग ते शिरगाव असे सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या कामात लक्ष घालून मूळ प्रस्तावित ठिकाणीच पूल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक, प्रवीण दरेकर, नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, निशिकांत पाटील, गौरव नायकवडी, उपसरपंच पोपट अहिर, प्रकाश पवार, मानाजी सापकर, संजय अहिर, नंदू पाटील, सावकर कदम, भीमराव अहिर, तलाठी एस. सुदेवाड, ग्रामविकास अधिकारी मधुकर हाताळे उपस्थित होते.

Web Title: Dry - Start work on Shirgaon sanctioned bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.