दुबईस्थित कंपनी आठशे कोटी गुंतविण्यास तयार

By admin | Published: July 15, 2016 11:22 PM2016-07-15T23:22:24+5:302016-07-16T00:03:09+5:30

महापौरांना पत्र : वाद होण्याची शक्यता

Dubai-based company ready to invest Rs | दुबईस्थित कंपनी आठशे कोटी गुंतविण्यास तयार

दुबईस्थित कंपनी आठशे कोटी गुंतविण्यास तयार

Next

सांगली : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी परदेशी बँका, कंपन्यांकडून कर्ज घेण्याची तयारी चालविली आहे. मध्यंतरी दुबईस्थिती पेट्रोकॉर्प कंपनीने पालिकेशी संपर्क साधला होता. आता या कंपनीकडून ८०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्रच कंपनीच्या प्रतिनिधींनी महापौर हारूण शिकलगार यांना दिले. या गुंतवणुकीवरून पालिकेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पेट्रोकॉर्प या दुबईच्या पेट्रोलियम कंपनीने महापालिकेच्या पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेसाठी कर्ज देण्याची तयारी दर्शविली होती. या कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रात्याक्षिकही दाखविले होते. त्यानंतर त्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी कंपनीचे प्रतिनिधी राजदील जमादार यांनी महापौर शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन ८०८ कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अत्याधुनिक अल्ट्राफिल्ट्रेशन दर्जाची शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येईल. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३८० कोटी व दुसऱ्या टप्प्यात ४२८ कोटी असा ८०८ कोटीचा रुपये खर्च होईल. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देऊ. या प्रकल्पामुळे भांडवली खर्चात वार्षिक ८ ते १० कोटीची बचत होणार आहे. सध्याच्या आपल्या प्रचलित दरानुसार पाणीपट्टी वसू करावी, त्यानंतर प्रत्येक वर्षी दहा टक्के नाममात्र दरवाढ करावी, असा करार २० वर्षासाठी करावा अशी अपेक्षा आहे. सध्याच्या जलशुध्दीकरण खर्चातील विद्युत शुल्क वार्षिक किमान ६ कोटी व रॉ वॉटर खरेदीचे किमान ४ कोटी असे दहा कोटी प्रत्येक वर्षी बचत होईल, शिवाय केमिकल खरेदी व देखभाल दुरुस्तीवरील खर्चही वाचणार आहे.
महापालिकेच्यावतीने तीनही शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी किमान ३०० कोटीचा जलपुरवठा वाहिनी व शंभर टक्के मिटरिंग करावा लागेल. (प्रतिनिधी)


४९० कोटीचे काम...
या प्रकल्पात वारणा पाणी उपसा योजना ७० कोटीचा खर्चही कंपनीकडून करण्यात येईल. पाणीपुरवठ्यासोबतच सांडपाणी, मलनि:सारणाचे उर्वरित १२० कोटीचे असे एकूण ४९० कोटीचे काम करावे लागणार आहे. या तिन्ही कामाचा सविस्तर अभ्यास करुन सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.

Web Title: Dubai-based company ready to invest Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.