वाळवा तालुक्यात ६७.४६ टक्के

By admin | Published: February 21, 2017 11:46 PM2017-02-21T23:46:53+5:302017-02-21T23:46:53+5:30

चुरशीने मतदान : किरकोळ वाद वगळता शांततेत प्रक्रिया; अनेक ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार

In Dubawa taluka, 67.46 percent | वाळवा तालुक्यात ६७.४६ टक्के

वाळवा तालुक्यात ६७.४६ टक्के

Next


इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रांवरील परस्परविरोधी कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची वगळता, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ७२ हजार ८९0 इतके मतदार होते. त्यापैकी ६७.४६ टक्के मतदारांनी आपला मताचा हक्क बजाविला. एकूण १ लाख ८४ हजार ८० मतदारांनी मतदान केले.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समिती गणाच्या २२ जागा आहेत. त्यासाठी ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी ७.३0 वाजता तालुक्यातील ३0१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. दिवसभरात चिकुर्डे येथील आश्रमशाळेतील अपवाद वगळता एकाही मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड न होता मतदान यंत्रांवरील ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. चिकुर्डे येथील मतदान यंत्र सकाळी ७.३0 ते ८ या कालावधित बंद होते. तेथे नवीन यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
पहिल्या दोन तासात रेठरेहरणाक्ष गटात ८.५३ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ९.२९, कासेगाव गटात ९.४५, वाटेगाव गटात ७.४१, पेठ गटात ८.५७, वाळवा गटात १२.३६, कामेरी गटात ९.७४, चिकुर्डे गटात ९.४0, बावची गटात ९.४१, बागणी गटात ४.६२, तर येलूर गटात १२.२४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या वेळेत २४ हजार ८८४ मतदारांनी मताचा हक्क बजावला. त्यानंतरच्या २ तासात मतदानाची हीच टक्केवारी २२.0७ इतकी होती. ११.३0 वाजेपर्यंत ३६ हजार ८२७ पुरुष, तर २३ हजार ३८८ महिला मतदारांनी मतदान केले होते.
दुपारच्या टप्प्यात उन्हाचा ताव वाढल्याने मतदान केद्रांवर मतदारांची उपस्थिती रोडावली होती. दुपारी ४ नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. शेवटच्या दीड तासात राष्ट्रवादी काँग्रेस व रयत विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न चालवले होते. शेवटच्या दोन तासात अंदाजे १५ टक्क्यांची वाढ होऊन एकूण मतदान ६७.४६ टक्क्यापर्यंत पोहोचले. ९७ हजार ४९२ पुरूष, तर ८६ हजार ५८६ महिला मतदारांनी मतदान केले.
रेठरेहरणाक्ष गटात ९४.९६ टक्के मतदान झाले. बोरगाव गटात ६१.७३, कासेगाव गटात ७०.२०, वाटेगाव गटात ६४.३९, पेठ गटात ६७.०३, वाळवा गटात ७४.०४, कामेरी गटात ६४.९७, चिकुर्डे गटात ६८.३९, बावची गटात ७२.७८, बागणी गटात ६८.६३, येलूर गटात ६८.१५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. (वार्ताहर)

Web Title: In Dubawa taluka, 67.46 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.