कोरोनामुळे यंदाही यात्रा, जत्रा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:25+5:302021-05-29T04:20:25+5:30
पुन्हा मुलांच्या हाती मोबाइल सांगली : जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाल्याने मुले शाळेत जात होती. त्यामुळे ऑनलाइन ...
पुन्हा मुलांच्या हाती मोबाइल
सांगली : जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाल्याने मुले शाळेत जात होती. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास अनेक शाळांनी बंद केला होता. मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा बंद केल्यामुळे पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाइल आले आहेत.
चिंच बाजारात
सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदा चिंचेचे उत्पादन वाढले आहे. मात्र शहरात चिंच सहज मिळत नाही. उन्हाळ्यात गृहिणींना स्वयंपाकासाठी चिंचेची मोठी गरज असते. त्यामुळे बाजारात चिंचेला मागणी वाढत आहे. साहजिकच सोललेली चिंच बाजारात विक्रीसाठी आणली जात आहे.
गॉगलला मागणी
सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालविताना डोळ्यांना त्रास होत असतो. या त्रासापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वार गॉगल खरेदी करत आहेत. साहजिकच शहरातील दुचाकीस्वारांमधून गॉगलला मागणी वाढत आहे.
पाणी बचत गरजेची
सांगली : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासू शकते. याचा विचार करून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज आहे. आजही अनेक भागात नळाला तोट्या नाहर, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून वाया जात आहे.
वाजंत्रीवाले अडचणीत
करगणी : कोरोनामुळे सुधारित आदेशात लग्नकार्यात वाजंत्री, वाडपी, भटजींसह उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे अनेक लग्नघरचे वऱ्हाडी कमी होऊ नयेत, म्हणून कमी वाजंत्री लावण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.