चक्रीवादळामुळे उद्यापासून सांगलीत कोसळधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:41+5:302021-09-26T04:29:41+5:30
सांगली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सांगलीत रविवार, दि. २६ ते २९ सप्टेंबरपर्यंत चार दिवस मध्यम स्वरूपाच्या ...
सांगली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सांगलीत रविवार, दि. २६ ते २९ सप्टेंबरपर्यंत चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा मुक्काम राहणार आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची चिन्हे आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. वातावरणात अचानक बदल होणार असून, पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील तापमानात काहीअंशी घट होणार आहे. ढगांची दाटी व पावसाचा जोरही वाढण्याची चिन्हे आहेत. शनिवारी दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण होते. शनिवारी मध्यरात्रीपासून किंवा रविवारी सकाळी ढगांची दाटी वाढण्याची शक्यता आहे.