दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:13 AM2017-12-10T01:13:50+5:302017-12-10T01:15:26+5:30

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली.

 Due to fall in the price, the sweetness of the net decreased | दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

Next
ठळक मुद्देआवक वाढल्यानंतरही मिरचीच्या दरात तेजी; क्विंटलला चारशे रुपये दर हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली. बाजारात मिरचीची आवक वाढली असली, तरी दरात सरासरी क्विंटलला चारशे रुपयांची तेजी आहे. हळदीची आवकही वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. नांदेड आणि जळगाव जिल्ह्यातील हळदही विक्रीसाठी दाखल झाली.

यार्डात शेतमालाच्या आवकेत चढ-उतार सुरुच आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज सरासरी २७ ते ३० हजार भेली दाखल होत होत्या. परंतु आवक कमी होऊन २६ हजार भेली शनिवारी दाखल झाल्या होत्या. गुळाच्या दरातही क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांची घसरण झाली. पांढरा गूळ ३५०० रुपये क्विंटल, तर तांबूस गूळ ३६०० ते ४१०० रुपये क्विंटल भाव होता. मक्याची आवकही २५ टक्क्यांनी थंडावली. दरात पंचवीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली. साडेबाराशे ते एक हजार २७५ रुपये क्विंटलचा भाव राहिला.

हळदीच्या आवकेत वाढ झाली. दररोज दीडशे टन मालाची आवक विक्रीसाठी होत आहे. आंध्रप्रदेश, नांदेड आणि जळगावमधूनही माल येत आहे. राजापुरी हळदीला आठ हजार दोनशे ते अकरा हजार रुपये क्विंटल दर आहे. आंध्रप्रदेश, जळगाव आणि नांदेड येथील हळदीचा दर सात ते आठ हजार होता.
मिरची दाखल झाली असून, दरातही तेजी आहे. पाचशे रुपयांची क्विंटलला वाढ झाली आहे. तेजा मिरची ९५०० ते दहा हजार क्विंटल, ब्याडगी १५ ते १८ हजार, तर ब्याडगी डॅमेज दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा भाव होता. मकर संक्रांतीपासून आवक वाढणार असल्याचे सांगलीतील व्यापाºयांनी सांगितले.

मक्याला हमीभाव १४२५, खरेदी ११५० रुपयांनीच
राज्य शासनाने मक्यासाठी हमीभाव प्रति क्विंटलला १४२५ रुपये ठरविला आहे. हमीभाव केंद्रावर मका खरेदीची मर्यादा असल्यामुळे शेतकºयांची व्यापाºयांकडून लूट केली जात आहे. सध्या मका केवळ प्रति क्विंटल ११५० रुपये दराने खरेदी केला जात आहे. हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरीही शेतकरी संघटना आणि राजकर्त्यांचेही याकडे लक्ष नसल्यामुळे व्यापाºयांकडून लूट होत आहे. शासन तरी याकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकºयांतून उपस्थित होत आहे.

Web Title:  Due to fall in the price, the sweetness of the net decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.