पाणवठे आटल्याने वाघांचे जीवन धोक्यात
By admin | Published: July 13, 2014 01:05 AM2014-07-13T01:05:02+5:302014-07-13T01:05:02+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक पाणवठे संपल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात भटकू लागले असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसाचा महिनाभरापासून पत्ता नाही;
सांगली : दारूच्या नशेत ट्रक चालवताना दुचाकीस्वारास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर आज, शनिवार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. साहेबराव नामदेव कांबळे (वय ३०, रा. गुळवंची, ता. जत) असे चालकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. येथील आपटा पोलीस चौकीजवळ काल, शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. यामध्ये समडोळी (ता. मिरज) येथील सतीश अण्णासाहेब बेले (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
बेले कुपवाड एमआयडीसीत एका कारखान्यात कामास होते. ते रात्री कामावरून समडोळीला दुचाकीवरून (एमएच १० एए ३९०३) निघाले होते. येथील पुष्पराज चौकातून काळी खणमार्गे ते येत होते. त्यावेळी ट्रक (एमएच १० झेड २११७) मिरजेला निघाला होता. चालक कांबळे दारूच्या नशेत होता. त्याने बेले यांना समोरून जोराची धडक दिली. त्यानंतर त्याने बेले यांना दुचाकीसह दीडशे फूट फरफटत नेले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातानंतर कांबळेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. नागरिकांनी ट्रकही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला. दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होऊ शकतो, हे माहीत असूनही कांबळेने बेदरकारपणे ट्रक चालवून भीषण अपघात केला. यामुळे त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)