लॉकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:58+5:302021-04-15T04:25:58+5:30
सांगलीतील शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या शिवभोजन केंद्रात दुपारी १ वाजता शिवभोजन थाळी घेण्यासाठी गर्दी झाली होती. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...
सांगलीतील शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या शिवभोजन केंद्रात दुपारी १ वाजता शिवभोजन थाळी घेण्यासाठी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाॅकडाऊनमुळे एकीकडे अनेक गोरगरीब जनतेची रोजी जात असताना त्यांच्या रोटीची व्यवस्था शासनाने शिवभोजन थाळीतून केली आहे. आगामी पंधरा दिवस ही थाळी गरीब व गरजू लोकांना मोफत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील किती लोकांना याचा लाभ मिळणार याबाबत स्पष्ट आदेश नसले तरी सध्या जिल्ह्यात या केंद्रांवरून ३ हजार थाळ्या भोजन दिले जाते.
सांगली जिल्ह्यात सर्वत्र शिवभोजन केंद्रे व्यवस्थित कार्यान्वित आहेत. गरजू लोकांना यापूर्वी दहा रुपयांत जेवण देण्याची ही योजना हाेती. आता यातील बहुतांश थाळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट आदेश अद्याप जिल्हा प्रशासन किंवा पुरवठा विभागास प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळीचा लाभ सध्या अनेक गोरगरीब लोक घेत आहेत. सर्व केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत थाळ्या संपलेल्या असतात. पूर्ण पंधरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेकांचा रोजगार या काळात बुडणार आहे. अशा वेळी पोटासाठी या शिवभोजन थाळीचा आधार कष्टकरी व गरजू लोकांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वागत केले जात आहे.
चौकट
थाळीचा लाभ घेणारे
कोट
दिवसभर घर चालविण्यासाठी राबण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिवभोजन थाळीतून थोडे पैसे शिल्लक राहतात. लॉकडाऊनमुळे आता काम मिळणार नाही. त्यात मोफत भोजन मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे.
- शिवाजी शिंदे, सांगली
कोट
अगोदरपासूनच कमी पैशात भोजन मिळत होते. आता लॉकडाऊन काळात ते भोजन मोफत मिळणार असेल तर अनेक गोरगरीबांना आधार मिळेल.
- जयराज बांगडी
कोट
शिवभोजन थाळी ही गरजू लोकांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. ती कायम ठेवायला हवी. त्याचा लाभ अनेकांना मिळतो.
- राजेंद्र ऐवळे
चौकट
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २२
दररोज थाळीचा लाभ घेणारे लोक ३०००
पॉइंटर
दररोज तीन हजार लोक घेतात लाभ
दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी दिली जाते. अनेक केंद्रावर दुपारी २ पूर्वीच थाळ्या संपलेल्या असतात. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल व मुख्य बसस्थानकामध्ये असलेल्या शिवभोजन केंद्रात बुधवारी दीड वाजताच सर्व थाळ्या संपल्या होत्या. अनेकांनी चौकशी केली तरी त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.