सांगली जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, द्राक्ष बागायतदार चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:09 PM2018-11-19T14:09:17+5:302018-11-19T14:10:38+5:30
सांगली जिल्ह्यातही कुंडल येथे काल रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . दुपारी 3 नंतर क्रांती कारखाना परीसर , बलवडी फाटा या भागात मध्यम पाऊस झाला .
सांगली-- सांगली जिल्ह्यातही कुंडल येथे काल रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . दुपारी 3 नंतर क्रांती कारखाना परीसर , बलवडी फाटा या भागात मध्यम पाऊस झाला . त्यानंतर मध्यरात्री दहा मि. पाऊस पडला . मात्र पहाटे 6.30 नंतर मुसळधार पाऊसास सुरुवात झाली असून विजेच्या गडगडाटासह मोठा पाऊस सुरु असून वातावरण अत्यंत कोंदट झाले असून या पावसाने ऊसाच्या तोडी ठप्प झाल्या असून परीसरातील द्राक्षबागायतदार या अवकाळी पावसाने पुरता हबकला आहे .
काही द्राक्षबागा पोंगा अवस्थेत तर काही फ्लाऊरींग स्टेजमध्ये आहेत. या पावसाने द्राक्षासह टो, झेंडू या सह इतर पिकांचे नुकसान होणार असून आधीच शेतीमालाच्या दराच्या सुलतानी संकटात सापडलेला शेतकर्यावय हे अस्मानी संकट ओढवले आहे . मात्र गहु, हरभरा या पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे .
कडेगाव व परीसरात पहाटे पाच वाजले पासून पाऊस सुरू दहा कारखान्याचे ऊस तोडी बंद राहणार.अवकाळी पडणाऱ्या पावसांनी द्राक्ष बागायतदार ही हवालदिल झाले आहेत.
बोरगाव ताकारी नवेखेड जुनेखेड मसुचीवाडी व परीसरात सलग पाच तास संत्तधार पाऊस सुरू अवेळच्या झालेल्या पावसाने सोयाबीन भात तुर भूईमुग काढणी केलेल्या शेतऱ्यांचे व उभ्या पिकांचे ही नुकसान.
वाळवा सुर्यगाव , नागठाणे परिसरात आज सकाळपासून पाऊस झाल्याने ऊस तोडी बंद पडल्या आहेत. वाळवा व परिसरातील गावात ही पाऊस पडला आहे. सूर्योदयापुर्वी पासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. कोंदट वातावरण व गारवा याने लोकांना उत्साह हरवले प्रमाणे झाले आहे. द्राक्षे बागायतदार यांची भिती वाढली आहे. अनेक बागा फलाॅवरिंगला आहेत , काही पोंगयात तर काही पक्व होऊन विक्रीला आल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवारात पाणी साठले आहे. त्यामुळे ऊस तोडी बंद पडले आहेत.
भिलवडी परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण,तासभर जोरदार पाऊस पडला.शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडणी पूर्णपणे बंद. पेठ येथे पाऊस सुरू झाला आहे
विटा शहरासह खानापूर परिसरात रात्री ११ पासून जोरदार अवकाळी पाऊस..विजांच्या कडकडाटासह पाऊस..
निर्यातक्षम द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदील ..
किर्लोस्करवाडी , रामानंदनगर व परिसरात 6:45 पासून जोरदार पाऊस सुरू........जनजीवन विस्कळीत
पलूस द्राक्षे बागेत पावसाचे पाणी साठून राहीले