राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली, ६० टक्के प्रवासीही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:31+5:302021-08-20T04:30:31+5:30
फोटो : सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना महामारी, लाॅकडाऊनच्या गर्तेत सापडलेल्या एस. टी. महामंडळाला ...
फोटो : सुरेंद्र दुपटे
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना महामारी, लाॅकडाऊनच्या गर्तेत सापडलेल्या एस. टी. महामंडळाला श्रावण महिन्याने चांगलाच हात दिला आहे. त्यात राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांसाठी ५० जादा बसेस सोडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह परजिल्ह्यातील एस. टी.च्या फेऱ्यांत २००ने वाढ झाली आहे.
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर एस. टी. महामंडळाच्या बसेसची चाके पुन्हा धावू लागली होती. पण प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नव्हता. राखी पौर्णिमेसह इतर सण, उत्सवांमुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांच्या संख्येतही ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर उत्पन्नही ४० लाखांपेक्षा अधिक मिळत आहे. राखी पौर्णिमेसाठी महामंडळाने ५० जागा बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे २०० फेऱ्यांची वाढ झाली असून, १६ हजार किलोमीटरचे अतिरिक्त अंतरही वाढले आहे. त्याचा परिणाम उत्पन्नवाढीवर होणार आहे.
चौकट
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
- कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस
- कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोवा - निजामुद्दीन एक्सप्रेस
चौकट
या मार्गांवर वाढवल्या फेऱ्या
- सांगली - सोलापूर
- सांगली - इचलकरंजी
-सांगली - पुणे
- मिरज - इचलकरंजी
चौकट
प्रवाशांची गर्दी
- निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने अनेक मार्गांवरील एस. टी.ची प्रवासी वाहतूक बंद होती.
- पण श्रावण महिन्यातील सणासुदीमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बहुतांश सर्वच मार्गांवर गर्दी होत आहे.
चौकट
फेऱ्या वाढवल्या
एस. टी. महामंडळाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लाॅकडाऊनंतर प्रमुख मार्गांवर बसेस सुरू केल्या होत्या. आता ग्रामीण भागातही बसेस धावू लागल्या आहेत. प्रवाशांचाही अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या संख्येत ६० टक्के तर उत्पन्नात ८० टक्के वाढ झाली आहे.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक.