कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

By अशोक डोंबाळे | Published: July 18, 2024 06:01 PM2024-07-18T18:01:20+5:302024-07-18T18:01:56+5:30

‘चांदोली’त ६२ टक्के, तर ‘कोयने’त ४२ टक्के पाणीसाठा

Due to increased rainfall in Kolhapur, Sangli, Satara districts, water inflow from Krishna river to Almatti Dam increased by 72 thousand 286 cusecs | कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

कर्नाटकातील अलमट्टी धरण ८१ टक्के भरले, ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरु

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून ८१ टक्के धरण भरले आहे. धरणातून सध्या ६५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. चांदोली (वारणा) धरणात ६२ टक्के, तर कोयना धरणात ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सलग आठ दिवस जोरदार पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार सध्या चांदोली (वारणा), कोयना धरण क्षेत्रासह सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. शिराळा, वाळवा तालुक्यांत सोमवारी संततधार, तर उर्वरित तालुक्यांत पावसाची उघडझाप सुरू होती. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांचे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

अलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८ टीएमसी पाणीसाठ्याची आहे. गुरुवारी दुपारी या धरणामध्ये ९९.३२ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच दर जवळपास ८१ टक्के भरले आहे. धरणामध्ये सध्या ७२ हजार २८६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून ६५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. चांदोली (वारणा) धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या कालवा व विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून एक हजार ६४९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणातील पाणीसाठा

धरण - आजचा साठा - क्षमता
कोयना - ४४.०७ - १०५.२५
धोम - ०५.३९ - १३.५०
कन्हेर - ०४.१२ - १०.१०
वारणा - २१.५० - ३४.४०
दूधगंगा - ११.९३ - २५.४०
राधानगरी - ०५.०८ - ०८.३६
तुळशी - ०२.०४ - ०३.४७
कासारी - ०१.९४ - ०२.७७
पाटगाव - ०२.८० - ०३.७२
धोम-बलकवडी - ०१.०६ - ०४.०८
उरमोडी - ०२.७४ - ०९.९७
तारळी - ०२.५१ - ०५.८५
अलमट्टी - ९९.३२ - १२३.०८

जिल्ह्यात ९.५ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ४.७ (३००.८), जत ०.१ (२५०.८), खानापूर १.१ (२५६.६), वाळवा १७.७ (४११.६), तासगाव १.२ (३१४.८), शिराळा ५४.३ (५५५.३), आटपाडी ०.१ (२२३.६), कवठेमहांकाळ ०.८ (३२५.८), पलूस ३.९ (२९२.३), कडेगाव २.९ (३०३).

कृष्णा नदीची पाणीपातळी

कृष्णा नदीची गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची पाणीपातळी फुटांमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कऱ्हाड ७.२ फूट, बहे पूल ६, ताकारी पूल १३.०६, भिलवडी पूल १३.०२, आयर्विन १०, राजापूर बंधारा २०.१०, राजाराम बंधारा २२.५१ फूट आहे.

Web Title: Due to increased rainfall in Kolhapur, Sangli, Satara districts, water inflow from Krishna river to Almatti Dam increased by 72 thousand 286 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.