Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न!

By श्रीनिवास नागे | Published: November 4, 2022 04:02 PM2022-11-04T16:02:15+5:302022-11-04T16:03:11+5:30

दरवर्षी दिवाळी व तुळशीविवाहाला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो.

Due to lack of demand for tulsi marriage, prices of flowers in Mirj flower market decreased | Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न!

Tulsi Vivah: तुळशीचं लग्न, पण झेंडूच्या दरात विघ्न!

googlenewsNext

सांगली : दिवाळीला दोनशे रुपयापर्यंत गेलेला झेंडू दिवाळीनंतर ५० रुपयावर आला आहे. तुळशीविवाहाला मागणी नसल्याने मिरजेत फुलबाजारात फुलांचे दर घटले आहेत. फूल उत्पादक शेतकऱ्यांना आता लग्नसराईची प्रतीक्षा आहे.

मिरजेतील फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांचीही आवक होते. दरवर्षी दिवाळी व तुळशीविवाहाला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो. मात्र, यावर्षी दिवाळीनंतर झेंडूसह अन्य फुलांचेही दर कमी झाल्याने बाजारातील उलाढाल घटली आहे. पिवळ्या झेंडूचा दर ५० रुपयांवर व केशरी झेंडू ४० रुपयांपर्यंत आहे.

गुलाबाची फुले तीनशे रुपये शेकडा मिळत आहेत. चारशे रुपये किलोने विक्री होणारी शेवंती, निशिगंध, गुलाब, जरबेरा कार्नेशिया, गलांडा यासह सर्वच फुलांचे दर कमी आहेत. मिरजेतील मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले विक्रीसाठी येतात. फुलांचे किरकोळ विक्रेते या बाजारातून फुले खरेदी करतात. बाजारातून कर्नाटकासह मोठ्या शहरातही फुलांची निर्यात होते. दिवाळीनंतर मोठे सण उत्सव नसल्याने फुलांना दर मिळण्यासाठी लग्नसराईची प्रतीक्षा आहे.

लग्नसराईची प्रतीक्षा

तुळशीविवाहाला मागणी नसल्याने फुलाचे दर घटले आहेत. आता लग्नसराई व पुढील महिन्यात ख्रिसमससाठी फुलांना दर मिळण्याची शक्यता असल्याचे फुलविक्रेते सतीश कोरे यांनी सांगितले.

फुलांचे दर
निशिगंध - १०० रुपये किलो
झेंडू - ५० रुपये किलो
गलांडा - ५० रुपये किलो
गुलाब - ३०० रुपये शेकडा
शेवंती - ८० रुपये किलो

Web Title: Due to lack of demand for tulsi marriage, prices of flowers in Mirj flower market decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.