विश्वजित यांच्या आग्रहामुळे जिल्ह्याला ९० कोटींचा अतिरिक्त निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:39+5:302021-02-13T04:26:39+5:30
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ८९.१७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस ...
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत ८९.१७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी कदम यांनी, सांगली जिल्ह्यातील दुष्काळ, अतिवृष्टी आणि डोंगरी भाग अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक
परिस्थितीची मांडणी केली. अशा स्थितीत जिल्ह्याला अतिरिक्त निधी मिळाला पाहिजे, असा आग्रह धरला. यावर जिल्ह्याला जास्तीत-जास्त निधी मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्या विश्वजित कदम यांच्या हट्टासाठी मागीलवर्षी ५५ कोटी अतिरिक्त निधी दिला. आता ८९.१७ कोटींचा अतिरिक्त निधी देत आहे, असे या बैठकीत अजित पवार यांनी सांगितले.
बैठकीस अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार अनिल बाबर, सुमनताई
पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड, विक्रम सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह विभागातील आमदार व जिल्हा नियोजनचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो : १२ कडेगाव १
ओळ :
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत अर्थमंत्री अजित पवार, वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित हाेते.