लिंगनूरमध्ये दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:07 AM2021-01-13T05:07:11+5:302021-01-13T05:07:11+5:30
लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत १३ पैकी एक जागा बिनविरोध निघाली आहे. पाच प्रभागात १२ जागांसाठी शेतकरी ...
लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे ग्रामपंचायतीत १३ पैकी एक जागा बिनविरोध निघाली आहे. पाच प्रभागात १२ जागांसाठी शेतकरी विकास पॅनल व महाविकास आघाडी पॅनल, अपक्षांचे शेतकरी विकास पॅनल व महाविकास आघाडी पॅनल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांच्या सहभागाने रंगत वाढली आहे.
येथील मारुतीराव नलवडे यांनी ग्रामपंचायत, सहकारी संस्था अनेक वेळा बिनविरोध केल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर होणारी पहिली निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी चंद्रकांत नलवडे, पोलीस पाटील मलय्या स्वामी, मारुती पाटील, रावसाहेब पाटील, संजय पाटील, प्रभाकर मगदूम, चंद्रकांत नाईक, शिवलिंग मगदुम, प्रशांत मगदुम, नंदू नलवडे यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. शेतकरी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी उपसरपंच मारुती पाटील यांच्या विरोधात मिरज तालुका काँग्रेस समन्वयक रावसाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी पॅनल उभारून आव्हान उभे केले आहे.
चाैकट
आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या प्रभागांत मतदारांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. सत्ताधारी पॅनलने अनेक विकासकामे केल्याचा दावा केला असला तरी विरोधी गटाने कामे न केल्याचा दावा केल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.