चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक -: तासगावात संगीत खुर्चीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:10 AM2019-06-13T00:10:31+5:302019-06-13T00:12:19+5:30
तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना,
तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना, अधिकाऱ्यांच्या बदल्या मुदतीपूर्वीच का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षपणाला राजकारण्यांच्या महत्त्वाकांक्षेचे काटे बोचत असल्याची चर्चा सुरू आहे.
सामान्यातील सामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आली, तर त्याची तक्रार ऐकून, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाईची भूमिका तासगाव पोलिसांनी घेतल्याचे गेल्या काही वर्षात पाहायला मिळाले. मात्र पोलिसांच्या या कर्तव्यदक्षपणाचा अडसर प्रस्थापित राजकारण्यांना सलणाराच होता. काही वर्षे तासगाव पोलीस ठाण्यात राजकीय मक्तेदारीसारखा कारभार सुरू होता. मात्र अलीकडच्या काळात पोलीस ठाण्यातील राजकीय मक्तेदारी मोडीत निघालेली आहे किंबहुना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या पाठबळावर तासगाव पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे.
मात्र जनतेतून बदलीची मागणी नसतानादेखील गेल्या काही वर्षात पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. अधिकाºयांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदल्या होत आहेत. चार वर्षात तब्बल आठ अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. तासगाव तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे तालुक्यातून एखादा गुन्हा दाखल झाला, तर अपवाद वगळता बहुतांश गुन्ह्यात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेपही होत असतो. मात्र राजकीय हस्तक्षेपाला बगल दिली जात असल्याने, नेत्यांचा इगो दुखावला जात आहे.
पाच वर्षांतील पोलीस निरीक्षकांचा कार्यकाल...
नाव कार्यकाल
दिलीप तळपे ३१ मे २0१५ ते 0१ जुलै २0१५
जितेंद्र शहाणे 0१ जुलै १५ ते २७ एप्रिल १६
अशोक कदम २७ एप्रिल १६ ते 0२ जून १६
मिलिंद पाटील 0२ जून १६ ते 0३ जून १७
राजन मान 0३ जून १७ ते १४ जून १७
अनिल तनपुरे १४ जून १७ ते २५ जून १८
उमेश दंडिल २५ जानेवारी १८ ते १७ जून १८
अजय सिंदकर १६ जून १८ ते ११ जून १९
राजेंद्र सावंत्रे नव्याने रूजू
अधिकाºयांचा कर्तव्यदक्षपणाच राजकारण्यांना अडसर ठरत असल्याचे बोलले जात आहे. यापुढे तरी चांगल्या अधिकाºयांना कार्यकाल पूर्ण होईपर्यंत कामाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.