कवठेमहांकाळ पश्चिम भागाला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:12+5:302021-06-04T04:21:12+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. कवठेमहांकाळ शहर आणि पूर्व भागातही दमदार पाऊस झाला. ...
शिरढोण :
कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. कवठेमहांकाळ शहर आणि पूर्व भागातही दमदार पाऊस झाला. पावसाचा फायदा खरड छाटणी झालेल्या द्राक्षबागांना होणार आहे.
गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यातील हवेत उष्णता जाणवत होता. दुपारी एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पश्चिम भागातील मळणगाव, जायगव्हाण, बोरगाव, अलकुड एम, शिरढोण, नरसिंहगाव या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.
खरशिंग, देशिंग, मोरगाव, कवठेमहांकाळ शहर, जाधववाडी, झुरेवाडी, कुची, हिंगणगाव, विठूरायाचीवाडीसह आसपासच्या गावामध्ये रात्री उशिरापर्यंत तुरळक पावसाची रिमझिम सुरू होती.
पूर्वेकडील रांजणी, अलकुड एस, नांगोळे, लंगरपेठ, ढालेवाडी, बसाप्पाचीवाडीसह परिसरात दुपारनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता. घाटमाथ्यावर घाटनांद्रे गावातही तुरळक पावसाने हजेरी लावली होती.