आता थेट गुजरातला जाता येणार; वास्को-ओखा, हुबळी-राजकोट साप्ताहिक एक्स्प्रेस मिरजमार्गे धावणार
By शीतल पाटील | Published: March 21, 2023 04:11 PM2023-03-21T16:11:51+5:302023-03-21T16:12:36+5:30
सुटीच्या हंगामात फक्त ही एक्स्प्रेस धावणार
सांगली/मिरज : सुटीच्या हंगामात वास्को (गोवा)-ओखा व हुबळी-राजकोट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ मार्चपासून जूनअखेरपर्यंत मिरजमार्गे धावणार आहे. मिरजेतून गुजरातला जाण्यासाठी थेट एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.
वास्को-ओखा विशेष एक्स्प्रेस ओखा येथून २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता निघेल व ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता वास्को येथे पोहोचेल. वास्को-ओखा एक्स्प्रेस ३० मार्च रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. ही गाडी ओखा ते वास्को २८ मार्च, ०४, ११, १८, २५ एप्रिल, ०२, ०९, १६, २३, ३० मे ०६, १३, २०, २७ जून अशा १४ फेऱ्या करणार आहे. वास्को ते ओखा ३० मार्च ०६, १३, २०, २७ एप्रिल ०४, ११, १८, २५ मे ०१, ०८, १५, २२, २९ जूनपर्यंत १४ फेऱ्या करेल.
ही एक्स्प्रेस मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, कामन रोड, वसई रोड, वापी, सुरत, भरुच, बडोदा, नादीद, अहमदाबाद, राजकोट, द्वारका या स्थानकावर थांबेल. ओखा-वास्को एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक बुधवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी येईल व वास्को-ओखा एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक गुरुवारी रात्री १० वाजता येईल.
राजकोट हुबळी विशेष एक्स्प्रेस ३० मार्च रोजी राजकोट येथून रात्री ८ वाजता निघेल व हुबळी येथे ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. ३१ मार्च रोजी हुबळी राजकोट एक्स्प्रेस पहाटे ०५ वाजून ४० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. या एक्स्प्रेसच्या राजकोट ते हुबळीदरम्यान ३० मार्च, ०६, १३, २०, २७ एप्रिल. ०४, ११, १८, २५ मे ०१, ०८, १५, २२, २९ जूनपर्यंत १४ फेऱ्या होतील. हुबळी ते राजकोट ०१, ०८, १५, २२, २९ एप्रिल, ०६, १३, २०, २७ मे ०३, १०, १७, २४ जून व ०१ जुलैपर्यंत १४ फेऱ्या करेल.
या एक्स्प्रेसला धारवाड, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, बडोदा, आळंद, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, वनकानेर येथे थांबा आहे. राजकोट-हुबळी एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ०६ .५५ वाजता येईल. हुबळी-राजकोट एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० वाजता येईल.