औदुंबरला ५ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव, पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

By श्रीनिवास नागे | Published: November 26, 2022 01:37 PM2022-11-26T13:37:48+5:302022-11-26T13:38:14+5:30

पहाटे पाचपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल.

Dutt Jayanti Utsav at Audumbar from 5th December in sangli district, various religious programs for five days | औदुंबरला ५ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव, पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

औदुंबरला ५ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव, पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

googlenewsNext

सांगली : औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त जयंती उत्सव सोमवार, दि. ५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे.

दि. ५ रोजी संग्रहमुख श्री दत्तयोग सह विविध धार्मिक कार्यक्रम व होमहवन होणार आहे. दि. ६ रोजी एकदिवसीय श्री गुरूचरित्र पारायण सोहळा होणार आहे. बुधवारी (दि. ७) मुख्य दिवस आहे. पहाटे पाचपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. पहाटे ५ ते ६.३० काकड व मंगल आरती, सकाळी ६.३० ते ११.३० अभिषेक, सकाळी १० नियोजित अन्नछत्र वास्तूचे भूमिपूजन होईल. दुपारी एकपर्यंत महापूजा, नैवेद्य व महाआरती, दुपारी ४ ते ५.३० श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे कीर्तन व सायंकाळी ५.३० ला श्री दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा सुरू होईल. रात्री ७.३० ते ९.३० धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करूणा त्रिपादी होईल.

गुरूवारी पहाटे ५ ते ६.३० काकड व मंगल आरती, सकाळी ६.३० ते ११.३० अभिषेक, दुपारी एकपर्यंत महापूजा, महानैवेद्य. दुपारी १ ते ३ या वेळेत श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने मंदिर परिसरात, तर पुजारी संदीप जोशी यांच्याकडून अवधूत मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ ते ७:३० माऊली व आनंदी मंडळ यांचे भजन, रात्री १२.१५ ते १.१५ धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली. शुक्रवार (दि. ९) रोजी पहाटे वासुदेव जोशी, नितीन गुरव, संतोष जोशी यांचे लळिताचे कीर्तन होईल. सकाळी ६.३० काकड आरती, महापूजा, मंगल आरतीनंतर श्री दत्त जन्मोत्सवाची सांगता होईल.

Web Title: Dutt Jayanti Utsav at Audumbar from 5th December in sangli district, various religious programs for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.