सांगली जिल्ह्यात ९७३३ शेतकऱ्यांचे ‘ई-केवायसी’ प्रलंबित

By अशोक डोंबाळे | Published: February 13, 2024 02:00 PM2024-02-13T14:00:47+5:302024-02-13T14:01:05+5:30

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार ५५५ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी तीन लाख ८७ ...

E-KYC of 9733 farmers pending in Sangli district | सांगली जिल्ह्यात ९७३३ शेतकऱ्यांचे ‘ई-केवायसी’ प्रलंबित

सांगली जिल्ह्यात ९७३३ शेतकऱ्यांचे ‘ई-केवायसी’ प्रलंबित

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार ५५५ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी तीन लाख ८७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण केले आहे. उर्वरित नऊ हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांसाठी दि. १२ ते २१ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ‘ई-केवायसी’ची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पीएम किसान योजनेतील ‘ई-केवायसी’ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार दि. १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण पूर्ण करावे. 

शेतकऱ्यांनी स्वतःचे ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा. ई-केवायसी पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

ई-केवायसी प्रलंबित लाभार्थी

तालुका - लाभार्थी संख्या
आटपाडी - ११३७
जत - २२०
कडेगाव - २१९
क.महांकाळ - ४६७
खानापूर - १२३१
मिरज - २०१५
पलूस - ९५७
शिराळा - १३५१
तासगाव - ३५७
वाळवा - १७७९
एकूण - ९७३३

Web Title: E-KYC of 9733 farmers pending in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.