इस्लामपुरात आज खा. एस. डी. पाटील जयंतीचे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:04+5:302021-01-23T04:27:04+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. खासदार एस. डी. पाटील यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त शनिवारी अॅड. बी. ...
इस्लामपूर : वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. खासदार एस. डी. पाटील यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त शनिवारी अॅड. बी. एस. पाटील यांनी लिहिलेल्या ‘सुधाई’ या मातृचरित्राचे प्रकाशन नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील यांनी दिली.
संस्थेच्या विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी सकाळी नऊ वाजता संस्थेचे सचिव अॅड. बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी ग्रामीण कथा, कादंबरीकार प्रा. दि. बा. पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा, उपाध्यक्ष सखाराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे.
अॅड. पाटील म्हणाले, खा. एस. डी. पाटील यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९४० ला वकीली व्यवसाय सुरू केला. १९४५ साली त्यांनी वाळवा शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९५२ साली वाळवा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. जिल्हा बॅँकेचे संचालक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशी विविध पदे त्यांनी भुषविली होती.’
चौकट
गेल्या ३५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली खा. एस. डी. पाटील आंतरराज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच स्थगित करण्यात येत आहे, असे धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केले.
खा. एस. डी. पाटील यांचा फोटो वापरणे.