खाद्यतेल दरवाढीचा भडका कायमच; भाज्या आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:35+5:302020-12-07T04:20:35+5:30
सांगली : गेल्या पंधरवडयापासून चढेच असलेले भाजीपाल्याचे दर आता आवाक्यात आले असतानाच, किराणा मालाच्या दरातील वाढ ग्राहकांची चिंता वाढविणारी ...
सांगली : गेल्या पंधरवडयापासून चढेच असलेले भाजीपाल्याचे दर आता आवाक्यात आले असतानाच, किराणा मालाच्या दरातील वाढ ग्राहकांची चिंता वाढविणारी ठरत आहे. एकीकडे भाज्या स्वस्त झाल्याचे समाधान असले तरी, खाद्यतेलाच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम राहिली. गहू, तांदळासह कडधान्यांचे दर मात्र, स्थिर आहेत, तर ताज्या आणि रसरशीत फळांची आवक चांगली होत असल्याचे चित्र आहे.
दिवाळी झाल्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. पंधरवड्यात अचानकपणे सरासरी ५० ते ८० रुपयांनी दर वाढले आहेत. या आठवड्यातही सरासरी १० रुपयांनी दर वाढले आहेत.
स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा, लसणाचे दरही चढेच आहेत. तरीही ग्राहकांची मागणी कायम आहे. पालेभाज्यांची चांगली आवक होत आहे. मेथी, पालक, करडई भाजीची आवक वाढली असून सरासरी दहा रुपयांना जुडी मिळत आहे. आठवडा बाजारात पालेभाज्यांना मागणी दिसून येत आहे.