सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:44+5:302020-12-07T04:20:44+5:30

०६ अरुण लाड सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेतर्फे कुंडल येथे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार केला. यावेळी महावीर पाटील, ...

Educated unemployed engineers will get justice | सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळवून देणार

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळवून देणार

Next

०६ अरुण लाड

सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेतर्फे कुंडल येथे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार केला. यावेळी महावीर पाटील, अतुल बेले, शरद लाड आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेतर्फे नवविर्वाचित पदवीधर आमदार अरुण लाड यांचा कुंडल येथे सत्कार करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, सचिन पाटील, निळकंठ मांगलेकर, सुधाकर कबाडे, अभिजित सावगावे, अतुल बेले, राकेश संगलगे, तुषार कदम, आकाश भोसले, विकास यादव, एल. टी. देसाई, मनोज तोरे, प्रशांत पाटणकर यांच्यासह वाळवा, तासगाव, पलूस तालुका संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पदवीधर निवडणुकीमध्ये सुबे संघटनेने लाड यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. जिल्हाभरातील अभियंत्यांनी लाड यांच्यासाठी रान उठविले होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने नाराज झालेल्या अभियंत्यांनी लाड यांना पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष महावीर पाटील यांनी सांगितले.

त्याची दखल घेत लाड म्हणाले की, पदवीधर बेरोजगार अभियंत्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. आमदार म्हणून काम करताना या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ताकद लावेन. अभियंत्यांना त्यांच्या हक्काची कामे मिळावीत यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करेन.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हेदेखील उपस्थित होते.

------------

Web Title: Educated unemployed engineers will get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.