सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य: मिरजेत प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने, भाजप कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट

By संतोष भिसे | Published: December 8, 2023 06:06 PM2023-12-08T18:06:00+5:302023-12-08T18:26:18+5:30

मिरज : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ...

Effigy of Karnataka Minister Priyank Khargen burnt in Mirjet for making derogatory remarks about SwatantryaVeer Savarkar | सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य: मिरजेत प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने, भाजप कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट

सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य: मिरजेत प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने, भाजप कार्यकर्ते-पोलिसांमध्ये झटापट

मिरज : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुतळा काढून घेताना पोलिस व भाजप कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी पुतळा काढून घेतल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजप प्रदेश सचिव मोहन व्हनखंडे, मकरंद देशपांडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, सागर वनखंडे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक गणेश माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Web Title: Effigy of Karnataka Minister Priyank Khargen burnt in Mirjet for making derogatory remarks about SwatantryaVeer Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.