शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:46+5:302021-03-10T04:27:46+5:30

देवराष्ट्रे : शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, ...

Efforts are being made to make water available to farmers' dams | शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

Next

देवराष्ट्रे : शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक दोनचे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी गणेश मरकड, आयुष सिंह, ताकारी पंपगृह क्र. एकचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसीलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक उपस्थित होते .

विश्वजित कदम म्हणाले, जिल्ह्यात ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ या सिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरत आहेत. उर्वरित दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या योजना पूर्ण करण्यावर भर देत आहोत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील सिंचन योजनांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.

कार्यकारी अभियंता डवरी म्हणाले, ताकारी पंपगृह क्रमांक एकची वितरिका क्रमांक दोन ही दहा किलोमीटरची आहे. यासाठी नऊ कोटी ५० लाखांचा खर्च झाला आहे. या वितरिकेवर २४ पाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आले असून, याव्दारे २४०० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या वितरिकेव्दारे देवराष्ट्रे, कुंभारगाव, जाधवनगर, बलवडी, कुंडल, आंधळी, पलूस येथील शेतीस पाणीपुरवठा होणार आहे.

विश्वजित कदम यांच्याहस्ते पाणी वितरण प्रारंभ करण्यात आला. कुंभारगाव येथे पाण्याचे पूजन करण्यात आले.

महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार, सुरेश खारगे, खाशाबा दळवी, रतन पाटील, उत्तमराव पवार, उमेश साळोखे, एन. बी. कांबळे, पी. एम. येसणे उपस्थित होते.

Web Title: Efforts are being made to make water available to farmers' dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.