समाजातील सर्व घटकांना अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:17+5:302021-06-09T04:33:17+5:30
इस्लामपूर येथील उप जिल्हा रुग्णालयास जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून तीन अद्ययावत व्हेंटिलेटर देण्यात आली. यावेळी जयंत पाटील, विजयसिंह ...
इस्लामपूर येथील उप जिल्हा रुग्णालयास जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून तीन अद्ययावत व्हेंटिलेटर देण्यात आली. यावेळी जयंत पाटील, विजयसिंह देशमुख, दादासाहेब पाटील, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. राणोजी शिंदे, बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, अरुण कांबळे, रोझा किणीकर, मनीषा रोटे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : समाजातील गोर-गरीब,सामान्य कुटुंबांना सध्या आरोग्यसेवा परवडत नाही. एखाद्या आजाराने कुटुंब अनेक वर्षे मागे जाते. त्यामुळे शासकीय रुग्णालय अद्ययावत करून समाजातील सर्व घटकांना आरोग्य सेवासुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून येथील उपजिल्हा रुग्णालयास २५ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेटर दिली. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत करून घेतले आहे. सध्या येथील कोविड सेंटरमध्ये ७ व्हेंटिलेटर आहेत. उपजिल्हा रुग्णालयात सर्व घटकांतील रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. याठिकाणी व्हेंटिलेटर कमी पडू नयेत म्हणून आणखी तीन व्हेंटिलेटर देत आहोत.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, पै. भगवान पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, नगरसेवक खंडेराव जाधव, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, संदीप पाटील, रोझा किणीकर, प्रियांका साळुंखे, रवी वाघमोडे, मोहन भिंगार्डे, काँग्रेस पक्षाच्या नेत्या मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.