दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:06+5:302021-06-17T04:19:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक आणि समाजाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक आणि समाजाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन नाठवडे केंद्राच्या केंद्रप्रमुख अलिशा मुलानी यांनी येथे केले.
खूजगाव (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पटनोंदणी पंधरवडा अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी तन्मय हिंदुराव सुतार या दिव्यांग विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याचा पहिलीमध्ये प्रवेश केला. गुलाबपुष्प देऊन त्याचे स्वागत केले. यावेळी केंद्रप्रमुख मुलानी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दीपक रोकडे होते.
मुलानी म्हणाल्या, समाजातील दिव्यांग विद्यार्थी शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करणे हे मोठे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देण्यासाठी पालकांनीही पुढे येणे गरजेचे आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, स्वाती सुतार, बापू सुतार, सचिन पोतदार, अश्विनी पोतदार, अर्चना गुरव, जयश्री सावंत, प्रणिती माने, श्रेया सुतार, आदी उपस्थित होते. संजय गुरव यांनी स्वागत केले तर सुनील गुरव यांनी आभार मानले.