आठ आण्याची मिरची; बारा आण्याचा मसाला!
By admin | Published: March 27, 2017 11:59 PM2017-03-27T23:59:44+5:302017-03-27T23:59:44+5:30
मसालाही तिखट : गृहिणींचे ‘बजेट’ कोलमडले; मिरचीच्या चौपट मसाल्याचा खर्च; ग्रामीण भागात चटणी तयारीची लगबग
कऱ्हाड : आहारातील महत्त्वाचा घटक कोणता म्हटलं तर तो चटणी म्हणून ओळखला जातो. याशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. अगदी झणझणीत अन् डोळ्यात पाणी आणणारी चटणी तयार करण्याची लगबग सध्या सर्वत्र गृहिणींकडून सुरू आहे. मात्र, सध्या वाढलेल्या मसाल्यांच्या दरामुळे ही चटणी बनविणे म्हणजे ‘चार आण्याची मिरची; बारा आण्याचा मसाला’ असे आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने सध्या गृहिणी उन्हाळी पदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढी चटणी तयार करून घ्यायच्या; पण सध्या मसाल्याचे दर वाढल्याने चार महिने पुरेल एवढीच चटणी बनवित आहेत. मसाल्यांच्या दरवाढीमुळे झणझणीत चटणी बनविताना गृहिणींच्या डोळ्यात पाणी येत आहे.
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. सूर्यनारायणही चांगलीच आग ओकत असल्यामुळे या उन्हाळा ऋतूत पापड, कुरवडी, भातवडी असे पदार्थ बनविण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. पावसाळ्यात हे पदार्थ बनविता येत नाहीत. तसेच हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा कमी असल्याने हे पदार्थ बनविण्यात अडचणी येतात. त्यामुळे उन्हाळ्यातच असे पदार्थ बनवून ठेवण्याकडे गृहिणींचा कल असतो.
घरगुती पदार्थांबरोबर उन्हाळ्यात चटणीही तयार केली जाते. सध्या शहरात बाजारपेठेत विकत मिळणारी रेडिमेड चटणी वापरली जाते. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही घरीच चटणी बनवून ती वापरण्याकडे कल असतो. त्यासाठी बाजारातून मिरच्या खरेदी केल्या जातात. कडक उन्हात त्या मिरच्या वाळविल्या जातात. तसेच गिरणीत किंवा घरगुती पद्धतीनेही चटणी तयार करून घेतली जाते. बाजारात रेडिमेड चटणी मिळत असली तरी घरगुती चटणीची चव व टिकाऊपणा चांगला असतो. त्यामुळेच ही चटणी वापरण्याला ग्रामीण भागात पसंती दिली जाते. सध्या शहरासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात मिरची तसेच त्यासाठी लागणारा मसाला हा विक्रीसाठी व्यापारी व शेतकऱ्यांकडून दुकाने थाटली गेली आहेत. यातून कोल्हापुरी, बेगडी, देशी, गुंटूर अशा विविध जातींच्या मिरच्या तसेच त्याच्या अधिक पटीने लागणाऱ्या मसाल्यांची विक्री केली जात आहे. या बाजारपेठांमध्ये सध्या गृहिणींकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.
कऱ्हाडात रविवारी व गुरुवारी या दोन दिवशी आठवडी बाजार भरवला जातो. मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडून आणले जाते. वेलची, तमालपत्री, काळीमिरी, लवंग आदी मसाल्यांचा चटणी बनविण्यासाठी वापर केला जातो. सध्या बाजारात मिरचीचा दर ९० ते १६० रुपये किलोपर्यंत आहे. मात्र, मसाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चटणी तयार करताना गृहीणींच्या डोळ्यात पाणी उभे राहत आहे. (प्रतिनिधी)
अठ्ठावीस मसाल्यांचे प्रकार व दर
१) खोबरे १०० रुपये एक किलो २) मोठे जिरे ५० ते ६० रुपये पाव किलो ३) काळेमिरे ५० रूपये पन्नास ग्रॅम ४) दालचिनी १० रूपये दहा ग्रॅम ५) लवंग १० रूपये दहा ग्रॅम ६) शहाजिरे १० रूपये दहा ग्रॅम ७) खसखस ४० रूपये ५० ग्रॅम ८) तीळ १० रूपये पन्नास ग्रॅम ९) मेथी १० रूपये पन्नास ग्रॅम १०) मोहरी १० रूपये पन्नास ग्रॅम ११) बडीशेप १० रूपये पन्नास ग्रॅम १२) बादलफूल १० रूपये दहा ग्रॅम १३) रामपत्री १० रूपये दहा ग्रॅम १४) मसाला वेलची २० रूपये दहा ग्रॅम १५) चिरफळ १० रूपये दहा ग्रॅम १६) नाकेश्वर १५ रुपये दहा ग्रॅम १७) जायपत्री २५ रूपये दहा ग्रॅम १८) जायफळ ५ रूपये एक नग १९) दगडफूल १० रूपये दहा ग्रॅम २०) तमालपत्री ५ रूपये दहा गॅ्रम २१) धना ३० रूपये पाव किलो २२) सोरेगड्डे २० रूपये पन्नास ग्रॅम २३) हिंग १० रूपये दहा ग्रॅम २४) हिरवी वेलची २० रूपये दहा ग्रॅम २५) सुंठ २० रूपये पन्नास ग्रॅम २६) ओवा १५ रूपये पन्नास ग्रॅम.
मिरची, चटणी विक्रीतून कुटुंब्ग्रामीणमध्ये ‘घरगुती’
तर शहरात ‘रेडिमेड’ चटणी
सध्या पूर्वीप्रमाणे आताही ग्रामीण भागात मिरची विकत घेऊन ती कडक उन्हामध्ये वाळवून त्यात विविध प्रकारचे मसाले घालून ती तयार केली जाते. या उलट शहरातील महिलांकडून बचत गटांतून तयार करण्यात आलेली रेडिमेड चटणी विकत घेतली जाते.ाास हातभार...
सध्या उन्हाळा ऋतू असल्यामुळे उन्हाळ्यात विविध पदार्थ बनविण्याकडे गृहिणींचा कल असतो. भातवडी, बटाटे वेफर्स, सांडगे, कुरवडी, लोणचे, विविध फळ, भाज्यांच्या चटणी असे घरगुती उन्हाळी पदार्थ हमखास ग्रामीण भागात बनविले जातात. यामध्ये शेतात मिरची पिकवून त्या वाळवून त्याची आठवडी बाजारात विक्री केली जाते. तर शहरात पाच ते दहा महिलांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या बचतगटाच्या माध्यमातून चटणी विक्री करूनही कुटुंबास हातभार लावण्याचे काम केले जाते.