जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:14+5:302021-05-05T04:44:14+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

Eight days of strict lockdown in the district from midnight today | जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

Next

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केेला.

महापालिकेने सांगली, मिरज, कुपवाड शहरांत बुधवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केलेला असतानाच पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहणार आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सोमवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५६८ वर पोहोचली आहे. ४० रुग्णांचा मृत्यूही झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आठ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. प्रशासनाशी चर्चेनंतर बुधवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल.

पाटील म्हणाले की, जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा अगदीच काठावर होत आहे. तो मिळविण्यासाठी प्रचंड ताकद लागत आहे. औषधांबाबतही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे ठरले आहे. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

दरम्यान, पालकमंत्री १ मेपासून विविध तालुक्यांना भेटी देऊन कोरोनास्थितीचा आढावा घेत आहेत. रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य काही भागात परिस्थिती भयावह आहे. तेथे कोरोना नियंत्रणासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौकट

केवळ वैद्यकीय सेवा सुरू

जिल्ह्यात काही गावांनी सोमवारपासूनच गावपातळीवर जनता कर्फ्यू लागू केला आहे. काही ठिकाणी आठवडाभरासाठी तर काही ठिकाणी पंधरवड्यासाठी व्यवहार बंद ठेवले आहेत. ही गावेदेखील आता आपोआपच जिल्हास्तरीय लॉकडाऊनमध्ये समाविष्ट झाली आहेत. या काळात फक्त वैद्यकीय सेवा व तिच्याशी निगडित व्यवहार सुरु राहतील. सध्याची सकाळी ७ ते ११ या वेळेची सवलत लागू नसेल.

Web Title: Eight days of strict lockdown in the district from midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.