बांबवडेत तरसाच्या हल्ल्यात आठ कोकरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:57+5:302021-03-28T04:24:57+5:30
वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथे तरसाच्या हल्ल्यात आठ कोकरे मृत्युमुखी पडली. यामुळे मेंढपाळांसह शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण ...
वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथे तरसाच्या हल्ल्यात आठ कोकरे मृत्युमुखी पडली. यामुळे मेंढपाळांसह शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये मेंढपाळांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बांबवडे येथील धर्मगिरीनजीक असणाऱ्या इनाम नावाच्या मळ्यामध्ये सुमन रघुनाथ मुळीक यांच्या शेतामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाटेगाव येथील करण भानुदास चव्हाण यांच्या मेंढ्यांचा कळप आहे. चव्हाण शुक्रवारी सकाळी मेंढ्यांचा कळप घेऊन चारावयास गेले हाेते. जाताना कळपातील काेकरे जाळीमध्ये बंदिस्त करून ठेवली हाेती. सायंकाळी पाच वाजता ते परतले असता जाळीमध्ये ठेवलेल्या कोकरे मृतावस्थेत पडली हाेती. तरसाच्या हल्ल्यात आठ काेकरे मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक देवकी तहसीलदार, बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.