महिला काँग्रेसतर्फे ‘एक गाव कोरोनामुक्त’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:18+5:302021-06-01T04:20:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘एक गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम महिला काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘एक गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम महिला काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आली. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांनी मिरज तालुक्यातील कांचनपूर हे गाव दत्तक घेऊन त्याठिकाणी उपक्रमास सुरुवात केली.
कांचनपूरमधील आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट देऊन पाटील यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. गावातील प्रत्येकाची कोरोना टेस्ट करण्यासाठी, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण करून त्यांना कोरोनामुक्त
करण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्रास मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन टँक, अँटिजन टेस्ट किट, थर्मल टेंप्रेचर गन, ऑक्सिमीटर, हॅन्डग्लोहज, पी.पी.ई. किट, फेसशिल्ड आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिरज तालुक्यातील प्रत्येक घरात गरजू रुग्णांना अन्नधान्य पुरविण्यात आले आहे. कोरोनाच्या विविध उपक्रमांतून जनतेची सेवा करण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वसंतदादा पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड सेंटरमध्ये रुग्ण सेवा चालू आहे.
यावेळी कार्यक्रमास मनीषा रोटे, अण्णासाहेब कोरे, सुरेश गायकवाड, कांचनपूरच्या सरपंच वनिता पाटील, उपसरपंच महादेव मोहिते, माजी सरपंच सुरेश शिंदे, बाबूराव शिंदे, नितीन माने, गुरुनाथ देशमुख, राजाराम पाटील, डॉ. शितोळे, डॉ. पाटील, डी.बी.थोरात, अरुणा शिंदे आदी उपस्थित होते.