निवडणूक ज्वर घेऊन प्रचारसाहित्य बाजारात -: सांगलीतून राज्यात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:08 AM2019-10-03T00:08:32+5:302019-10-03T00:09:38+5:30

प्रचारात सर्वात लक्षवेधी ठरते ते प्रचाराचे साहित्य. राजकीय पक्षांच्या चिन्हासह प्रमुख नेत्यांची छबी असलेल्या प्रचार साहित्याला मागणी असते.

Election fever with propaganda market | निवडणूक ज्वर घेऊन प्रचारसाहित्य बाजारात -: सांगलीतून राज्यात वितरण

सांगलीतील बाजारात विविध पक्षांचे झेंडे, टोप्या, चिन्हांचे कटआऊट्स, बॅचेस असे साहित्य दाखल झाले आहे.

Next
ठळक मुद्देपर्यावरणपूरक साहित्याला प्राधान्य; साहित्याचे प्रकार, मागणीतही बदल

शरद जाधव ।
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शनासाठी व प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्याची आता मागणी वाढली आहे. सांगलीतून तर संपूर्ण राज्यात प्रचार साहित्याचे वितरण होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच निवडणुकीचा ‘फिवर’ वाढण्यास सुरूवात झाली आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण होताच ख-याअर्थाने प्रचारास प्रारंभ होणार आहे. प्रचारात सर्वात लक्षवेधी ठरते ते प्रचाराचे साहित्य. राजकीय पक्षांच्या चिन्हासह प्रमुख नेत्यांची छबी असलेल्या प्रचार साहित्याला मागणी असते. यात झेंडे, टोप्या, गळपट्टी, बॅच, स्टीकर्स, टी-शर्ट, पताका, कटआऊट, छत्रीसह इतर साहित्याला मागणी असते.

प्रचारात गुंतलेले कार्यकर्ते मतदारांवर अधिक प्रभाव टाकण्यासाठी या साहित्याचा वापर करत असतात. निवडणुकांची चाहूल लागली की या साहित्य विक्री करणाºया दुकानांत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागते. सांगलीतून तर संपूर्ण राज्यात प्रचाराचे साहित्य पाठविले जाते. कोकणापासून ते नागपूरपर्यंत सांगलीतून साहित्याचे वितरण होते. निवडणुकीच्या अगोदर तीन महिन्यापासून या साहित्याची निर्मिती सुरू होते.

शासनाच्यावतीने प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. या नियमांची अंमलबजावणी प्रचार साहित्य करताना केली जात आहे. प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक साहित्याची निर्मिती केली जात आहे. प्रचार सुरू होण्यास चार दिवसांचा कालावधी असला तरी, उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उमेदवार करत असलेल्या शक्तिप्रदर्शनावेळी प्रचारसाहित्याला मागणी वाढत आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचार सुरू झाल्यानंतर तर या साहित्याला मागणी वाढणार आहे.


पर्यावरणपूरक साहित्याला : प्राधान्य
राज्यभर प्लास्टिक बंदी लागू असल्याने प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात येत नाही. उलट पर्यावरणपूरक प्रचारसाहित्य तयार केले जात आहे.


प्रचारसाहित्याचे दर
झेंडे ६ ते २००
गळपट्टी ६ ते २००
टोपी ४ ते ५०
बॅच २ ते २०


गेल्या २० वर्षांपासून प्रचारसाहित्य तयार करत आहे. संपूर्ण राज्यात साहित्य पाठविले जाते. राजकीय पक्षांसह कार्यकर्तेही साहित्य घेऊन जातात. येत्या काही दिवसात या साहित्याला मागणी वाढणार असल्याने त्याप्रमाणे साहित्य निर्मिती होत आहे. - तौफीकअली रंगरेज, प्रचार साहित्य उत्पादक, सांगली


 

Web Title: Election fever with propaganda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.