क्रांती कारखान्याची निवडणूक बिनविरोध

By Admin | Published: May 8, 2016 12:25 AM2016-05-08T00:25:37+5:302016-05-08T00:25:37+5:30

कुंडलमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव : कार्यक्षेत्रातील सर्व भागाला न्याय; संचालकांचा सत्कार

The election of the revolution factory is unconstitutional | क्रांती कारखान्याची निवडणूक बिनविरोध

क्रांती कारखान्याची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

कुंडल/पलूस : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २१ अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. बिनविरोधची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. कारखान्याची सलग सातवी निवडणूक बिनविरोध झाली आहे.
२१ जागांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक असे : ऊस उत्पादक गट क्र. १ अरुण गणपती लाड, रामदास कुंडलिक सावंत, संदीप बाळासाहेब पवार (सर्व कुंंडल), ऊस उत्पादक गट क्र. २ नारायण विठ्ठल पाटील (जगदाळे) (अंबक), जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे (दुधोडी), आप्पासाहेब यशवंतराव जाधव (आसद), ऊस उत्पादक गट क्र. ३ सतीश नाभिराज चौगुले (बुर्ली), उमेश ऊर्फ अनंत शंकर जोशी (अंकलखोप), दिलीपराव दत्तात्रय पाटील (नागराळे), ऊस उत्पादक गट क्र. ४ भगवंत तानाजीराव पाटील (पलूस), संपतराव रामचंद्र (काका) सावंत (सावंतपूर), पोपट नारायण संकपाळ (बांबवडे), ऊस उत्पादक गट क्र. ५ अंकुश रामचंद्र यादव (रामपूर), आत्माराम विठोबा हारूगडे (आळसंद), अरुण बापूसाहेब कदम (आंधळी), सहकारी संस्था मतदार संघ महावीर बळवंत बिरनाळे (अंकलखोप), अनु, जाती, अनु. जमाती मतदार संघ (कुंडल), महिला सदस्य मतदार संघ अलका अरविंद पाटील (देवराष्ट्रे), मंगळ आप्पासाहेब पाटील (पुणदी (वा.), इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ जयवंत गणपती कुंभार (कुंभारगाव), भ. वि. जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग, मतदार संघ निवृत्ती सखाराम पाटील (आमणापूर)
यावेळी अरुण लाड म्हणाले की, कारखान्याच्या स्थापनेपासून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या विचाराने सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कारखान्याचे कामकाज काटकसरीने करून, २५०० टनावरून ५००० टन ऊस गाळप क्षमतेत वाढ केली. सहवीज निर्मिती प्रकल्प १९.७० मेगावॅट विस्तारीकरण तसेच ६० केएलपीडी क्षमतेच्या आसवनी (इथेनॉल) प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. कारखान्याने अल्पावधित केलेल्या वाटचालीस व करत असलेल्या कामाची पोहोच म्हणून सर्व सभासद यांच्या सहकार्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, कुंडलिक एडके, वसंत लाड, दिनकर लाड, अनिल लाड, महावीर चौगुले, आनंदराव निकम, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव वसंत लाड, वित्त व्यवस्थापक शामराव जाधव, लेखाधिकारी आप्पासाहेब कोरे उपस्थित होते. (वार्ताहर)
बिनविरोधची परंपरा
क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी १९९५ मध्ये क्रांती कारखान्याची स्थापना झाली. यानंतर सहा निवडणुका बिनविरोध झाल्या. यावर्षी म्हणजेच २०१६-१७ ते २०२१-२२ वर्षासाठीची संचालक मंडळाची सातवी निवडणूकही बिनविरोध करण्यात कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना यश आले आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी कुंडलमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव व्यक्त केला.

Web Title: The election of the revolution factory is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.