संदीप शिंत्रे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:19+5:302021-09-24T04:30:19+5:30
शिरढोण : शिवसेनाप्रणीत शिव सामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी संदीप शिंत्रे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचा मान्यवरांच्या ...
शिरढोण : शिवसेनाप्रणीत शिव सामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी संदीप शिंत्रे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक सुरेश तुकाराम पाटील यांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथे या निवडी शिव सामर्थ्य सेना सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल पाटील, रफिक अहमद शेख ( जत ), तर कवठेमहांकाळ तालुका अध्यक्षपदी धनपाल माळी यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री दिवाकर रावते, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू दादा सकपाळ, सांगली-सातारा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या त्याप्रसंगी शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष संदीप भोज, सचिव अवि राऊत, सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ, संपर्क प्रमुख अमित देशमुख, अमोल ओलेकर व रमेश पवार उपस्थित होते.
230921\img-20210922-wa0015.jpg
संदीप शिंत्रे बातमी फोटो.