वीजबिल घोटाळाप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:47+5:302021-04-14T04:23:47+5:30
सांगली : महापालिकेच्या वीजबिल घोटाळा प्रकरणातील कागदपत्रे माहिती आधिकार कायद्यान्वये देण्यास टाळाटाळ केली जात असल्याबद्दल, सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे ...
सांगली : महापालिकेच्या वीजबिल घोटाळा प्रकरणातील कागदपत्रे माहिती आधिकार कायद्यान्वये देण्यास टाळाटाळ केली जात असल्याबद्दल, सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी १९ एप्रिलला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. शाळा क्रमांक एकच्या आवारात आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकारात रीतसर पत्रव्यवहार करूनही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ते केवळ आपल्या भीतिपोटीच ते तसे करीत असावेत. ७ एप्रिलला संबंधित अधिकारी एकदा भेटले. त्यावेळी त्यांनी उद्या माहिती देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणला. मी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असावे. माहिती देत नाही आणि कायद्याचा अवमान करीत असल्याबद्दल लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.