वीजबिल घोटाळ्यातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:10+5:302021-01-16T04:30:10+5:30

सांगली : सध्या चर्चेत असलेल्या महापालिकेच्या वीजबिल घोटाळा प्रकरणातील संशयितास शहर पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (वय २९, ...

Electricity bill scam suspect arrested | वीजबिल घोटाळ्यातील संशयितास अटक

वीजबिल घोटाळ्यातील संशयितास अटक

Next

सांगली : सध्या चर्चेत असलेल्या महापालिकेच्या वीजबिल घोटाळा प्रकरणातील संशयितास शहर पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (वय २९, रा. सांगलीवाडी) असे संशयिताचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर उभे केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयांची व इतरही वीजबिलांचे धनादेश महावितरणचा कर्मचारी खासगी भरणा केंद्रात भरत होता. मात्र, महापालिकेच्या बिलाऐवजी दुसऱ्याच ग्राहकांची बिले भरल्याचे चौकशीत समोर आले होते. तब्बल एक कोटी २९ लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

अटक केलेला संशयित पाटील हा महावितरणमध्ये मानधनावर कार्यरत आहे. या प्रकरणात दहा संशयिताचा सहभाग समोर आला आहे. वर्षभरापासून वीजबिलांची रक्कम भरण्यात आली नसल्याने वीजबिलाची थकबाकी समोर आल्यानंतर घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Electricity bill scam suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.