वीज ग्राहकांचे आंदोलन : अधिकारी, कर्मचा-यांची अन्यायी वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:48 PM2019-11-20T12:48:37+5:302019-11-20T12:49:42+5:30
संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला.
विटा : शेती, घरगुती, व्यापार व उद्योजक वीज ग्राहकांसह शेतकºयांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पलूस व कडेगाव तालुक्यातील वीजग्राहक व शेतकºयांनी महावितरणविरोधात मंगळवारपासून विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. देवराष्ट येथील प्रा. श्रीदास होनमाने, पलूसचे राजाराम अनुसे आणि सुग्रीव बुचडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपोषणात वीजग्राहक व शेतकरी सहभागी झाले आहेत.
महावितरण विभागाने वीजग्राहक शेतक-यांवर सातत्याने अन्याय केला आहे. वीज कनेक्शन न देता वीज बिले देण्यात आली आहेत. घरगुती मीटरचे छायाचित्र न काढता ग्राहकांना वीज बिले दिली आहेत. त्यामुळे चुकीची दिलेली वीज बिले माफ करावीत, तसेच भ्रष्ट अधिका-यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, यासह विविध मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
यावेळी उपोषणकर्त्यांच्यावतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, महावितरणचे कार्यकारी अभियंता कदम यांना निवेदन देण्यात आले. संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला.
यावेळी उत्तम चोथे, महादेव होवाळ, महेश फासे, सूर्यकांत बुचडे, गोरखनाथ औंधे, अर्जुन दिवटे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.