शिराळा ‘तहसील’ला विजेचा ठेंगाच

By Admin | Published: April 5, 2016 11:34 PM2016-04-05T23:34:36+5:302016-04-06T00:09:55+5:30

चर्चा निष्फळ : अन्य कार्यालयांना सोडून शिराळ््यातच कारवाई झाल्याने संताप

Electricity for the Tehal tehsil | शिराळा ‘तहसील’ला विजेचा ठेंगाच

शिराळा ‘तहसील’ला विजेचा ठेंगाच

googlenewsNext

शिराळा : वीज वितरण कंपनीने वीज तोडल्याने चौथ्या दिवशीही तहसील कार्यालयाचे कामकाज अंधारातच सुरू होते. सायंकाळी ४ च्या दरम्यान या कार्यालयाने जनरेटर दुरुस्ती करून विजेची सोय केली. सप्टेंबर २०१५ पासूनच्या थकबाकीमुळे शिराळा तहसील कार्यालयाची वीज तोडण्यात आली आहे. मात्र वाळवा तहसीलची एप्रिल २०१५ पासून थकबाकी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध प्रांत व तहसील कार्यालयाच्या थकबाकी असून, तेथे कोणतीही कारवाई न झाल्याने शिराळ्याच्या कारवाईबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
शुक्रवार, दि. १ रोजी सकाळी वीज कार्यालयाने शिराळा तहसील कार्यालयाची ९५ हजार रुपये सप्टेंबर २०१५ पासूनची थकबाकी आहे म्हणून वीज तोडली. यावेळी तहसीलदार दीपक वजाळे यांनी नगरपंचायत प्रशासक म्हणून शिराळा वीज कार्यालयास तसेच शिरसी वीज कार्यालयास सील ठोकले होते. यानंतर वीज कंपनीने पैसे भरले म्हणून शिरसीचे कार्यालय सुरू करण्यात आले, तर पैसे भरण्याचे आश्वासन दिल्याने शिराळा कार्यालयाचे सील काढले. मात्र वीज कंपनीने तहसील कार्यालयाने पैसे भरल्याशिवाय वीज जोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
सांगलीचे मुख्य कार्यकारी अभियंता एम. जी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व ठिकाणची वीज बिले भरली आहेत. फक्त शिराळ्याचे बिल राहिले. यामुळे तेथील वीज खंडित केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. सांगली जिल्ह्यातील ६ तहसील कार्यालये, दोन प्रांत कार्यालय्ो तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची थकबाकी आहे. तेथे कोणतीही कारवाई नाही. यामुळे शिराळा कार्यालयाबाबत वेगळा न्याय दिला आहे. यामुळे तहसील कार्यालय वीज वितरण कंपनी यांच्यातील वादास वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वीज पुरवठा चार दिवस खंडित झाल्याने विद्यार्थी, नागरिक आदींची अनेक कामे खोळंबली आहेत. चांदोली आदी दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
उन्हाळ्याची होरपळ आणि नाहक त्रास सोसावा लागत आहे. उन्हाळ्याची होरपळ आणि दोन कार्यालयाची परिस्थिती यातून आणखी जनता होरपळून निघाली आहे. (वार्ताहर)

वाईटातून चांगली गोष्ट
आठ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले जनरेटर बंद अवस्थेत होते. वीज तोडल्याने हे जनरेटर तातडीने दुरुस्त करण्यात आले. वाईट गोष्टीतून एखादी चांगली गोष्ट घडते, हे नक्की.
इस्लामपूर विभागीय कार्यालय इस्लामपुरात आहे त्याठिकाणी कोणतीही कारवाई नाही.

Web Title: Electricity for the Tehal tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.