हाथी चले अपनी चाल, अशी राहील वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:19 AM2019-05-24T00:19:54+5:302019-05-24T00:20:00+5:30
अविनाश कोळी सांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली ...
अविनाश कोळी
सांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली आहे. भविष्यातही माझी वाटचाल याचपद्धतीची राहणार आहे. टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेची कामे करण्यास प्राधान्य राहील, असे मत संजयकाका पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : इतक्या चुरशीच्या लढतीत मिळालेले विजयाचे श्रेय कोणाला द्याल?
उत्तर : भाजपने म्हणजेच केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्यात केलेल्या कामास ही पोहोचपावती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता दिलेल्या योगदानामुळे हा विजय मिळाला आहे. हा विजय मी जनतेच्या चरणी अर्पण करीत आहे.
जातीय समीकरणांमुळे मताधिक्य घटले असे वाटते का?
जातीय समीकरणांचा वापर करून अत्यंत चुकीच्या पद्धतीचे राजकारण विरोधकांनी केले. या समीकरणांना जनतेने थारा दिला नाही. त्यामुळेच चांगल्या मताधिक्याने माझा विजय झाला आहे.
निवडणुकीत तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त खटकली?
अत्यंत खालच्या पातळीवर, विषारी प्रचार माझ्याविरोधात केला गेला. प्रचाराची ही पातळी सर्वाधिक खटकली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाणे मी पसंत केले. म्हणून जनतेने कौल दिला.
भविष्यातील तुमचे संकल्प काय आहेत?
सिंचनाची उर्वरित कामे पूर्ण करून दुष्काळग्रस्त भागास दिलासा देणे, उद्योग, व्यापार वाढीला चालना मिळेल, असे प्रकल्प राबविणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. पाच वर्षांत नियोजित सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प राहील.