कसबे डिग्रज पाणी योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2015 11:24 PM2015-06-17T23:24:19+5:302015-06-18T00:40:01+5:30

जॅकवेल-इनटेक वेलचा संपर्क तुटला : वाळू, माती उपशाचा परिणाम

Elimination of Kasbe Degreej Water Scheme | कसबे डिग्रज पाणी योजनेचा बोजवारा

कसबे डिग्रज पाणी योजनेचा बोजवारा

Next

सोमनाथ डवरी - कसबेडिग्रज -कृष्णा नदीवर ब्रम्हनाळ डोह येथून कसबे डिग्रज आणि तुंग बागणी पाणी पुरवठा योजना गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. पण सततच्या वाळू उपशामुळे इनटेक वेल आणि जॅकवेलजवळील नदीकाठ खचल्याने या दोन्हीमधला संपर्क तुटला आहे. त्यामुळे संपूर्ण योजनेचा बोजवारा उडाला आहे. तात्पुरती उपाययोजना करून पाणी पुरवठा सुरूआहे. मात्र वेळेवर उपाययोजना न केल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कृष्णा नदीतून गेली कित्येक वर्षे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. ब्रम्हनाळ डोह ते डिग्रज बंधाऱ्यापर्यंत शेती आणि नळपाणी पुरवठ्याची जॅकवेल आणि इनटेक वेल यांची मोठी संख्या आहे. पण वाळू उपसा आणि वीट भट्टीसाठी माती उपशामुळे या योजना धोक्यात आल्या आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही वाळू वीटसम्राट आणि स्वार्थी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे संपूर्ण नदीकाठ योजना धोक्यात आल्या आहेत. पण सध्या याबाबत कोणीही बोलत नाही.
नदीकाठच्या गावात बदलीसाठी तलाठी, महसूल खाते ‘अर्थपूर्ण’ फिल्डिंग लावत आहे. पण आमदार-खासदार आपापल्या बगलबच्च्यांना मोठे करण्यासाठी वाळू ठेके देत होते. सध्या गावोगावच्या पुढारी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांमध्ये वाळू ठेकेदारांचा मोठा सहयोग दिसत आहे. अनेक कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारीही ‘गब्बर’ झाले आहेत.
कसबे डिग्रजमध्ये ग्रामपंचायतीने थेट नदीतून मोटारीद्वारे तात्पुरती यंत्रणा राबवून पाणी पुरवठा सुरू केल्या आहेत. पण पावसाळ्यात नदी पात्रात पाणी वाढले तर ही यंत्रणा टिकणार नाही, असे चित्र आहे.
नव्याने जॅकवेल-इनटेक वेल उभारणे सोपी, खर्च न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

जॅकवेलला धोका...
कसबे डिग्रजमध्ये पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्याने ग्ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. सध्या पाणी पुरवठा करणारी जॅकवेल आणि इनटेक वेल ‘ढासळण्याच्या’ स्थितीत आहे. अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. तुंगमध्ये शेती पाणी योजनेतून काही दिवस पाणी दिले जात आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Elimination of Kasbe Degreej Water Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.