दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:09 PM2019-04-05T15:09:43+5:302019-04-05T15:11:02+5:30

कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण

Employment in employment due to non-familial migration | दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

दुष्काळात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर

Next
ठळक मुद्देटंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ या कायमस्वरुपी दुष्काळी गणलेल्या तालुक्यातील जनता तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे. टंचाईग्रस्त स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, या सततच्या दुष्काळाने अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. कामच मिळत नसल्याने स्थलांतराची वेळ आली असून, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची वाढती मागणी होत आहे.  

कवठेमहांकाळ हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका. सततच्या दुष्काळाने ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असून काही भागात म्हैसाळ व टेंभू योजनेची कामे झाली. परंतु घाटमाथ्यावर बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. जलसिंचन योजना झालेल्या भागातही पाण्याचे आवर्तन मोक्याच्या वेळी बंद असते.  त्याचा फटका शेतीला बसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने खरीप व रब्बीचा पेरा वाया गेला. बळीराजाने मशागती, खते, औषधे यावर केलेला खर्चही वाया गेला. काही शेतकºयांनी पीक विमा भरला. पण त्याचा परतावाही समाधानकारक मिळाला नाही. 

सध्या तीव्र चारा व पाणी टंचाई तालुक्यात जाणवू लागली आहे. पाऊसच न झाल्याने व रब्बी, खरीप हंगाम वाया गेल्याने, त्यातच पावसाविना नैसर्गिक चारा उपलब्ध न झाल्याने चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठेही जलस्रोत उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्नही जाणवत असून, पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले असल्याने जनावरे जतन करणे जिकिरीचे झाले आहे. 

परिसरात नगदी पीक म्हणून द्राक्ष व डाळिंब लागवडीला शेतकºयांनी पसंती दिली. त्यामुळे हळूहळू बागायत क्षेत्रही वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व हवामानाच्या लहरीपणामुळे  बागायत क्षेत्रही घटू लागले आहे. सततच्या टंचाईमुळे बागा जतन करणेही जिकिरीचे बनले आहे. सध्या काहींनी पाण्याविना बागा सोडून दिल्या आहेत, तर काहींनी बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

चारा व पाण्याविना जनावरे जतन करणे कसरतीचे झाले असून, चारा छावणी सुरू करण्याची मागणी शासनदरबारी धूळ खात पडली आहे. जनतेच्या व जनावरांच्या हलाखीत नेतेमंडळी व प्रशासकीय अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात अडकला असून, जनता मात्र मरणयातना सहन करीत आहे. जनतेला दुष्काळाच्या झळा जाणवू दिल्या जाणार नाहीत, ही सरकारची घोषणा हवेत विरल्याचे जाणवत आहे.

Web Title: Employment in employment due to non-familial migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.