शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्रीतून तरुणांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:23+5:302020-12-30T04:36:23+5:30
प्रशिक्षित शेतकऱ्यांच्या गटांद्वारे उत्पादित भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, आदींच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांच्या ब्रँडची निर्मिती करण्यात आली ...
प्रशिक्षित शेतकऱ्यांच्या गटांद्वारे उत्पादित भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, आदींच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांच्या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील होतकरू, प्रामाणिक व जबाबदार युवक, युवतींना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमध्येही शेतकरी उत्पादकांना कंपनीच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे येथील लोकांसाठी थेट सोसायटींची ऑर्डर घेऊन भाजीपाला पोहोचविला जात आहे. ऑर्डर देण्यासाठी एका सोसायटीच्या किमान ४०ते ५० ऑर्डर असल्यास एका गाडीतून भाजीपाल्याचे किट पाठविले जाते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळा भाजीपाला व फळांची किट बनवून थेट सोसायटीपर्यंत उपलब्ध केले जाते. कोरोनामध्ये सहा हजार ५११ टन भाजीपाला व फळे यांची विक्री व ५० टन द्राक्षांची विक्री केली आहे.
चौकट
बेदाणा, हळदीचे ऑनलाईन सौदे
कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हाच द्राक्ष, बेदाणा आणि हळदीचा हंगाम सुरू होता. सांगली मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात मालाची आवक सुरू असतानाच शंभर टक्के लॉकडाऊन झाले होते. शेतकरी हतबल झाला होता. या कठीण परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करून ई-नामद्वारे बेदाणा, हळदीचे सौदे काढण्यास सुरुवात केली. या सौद्यास कोरोनामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.