कुपोषण मुक्तीसाठी मातांना सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:39+5:302021-09-09T04:32:39+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे बुधवारी जिल्हास्तरीय राष्ट्रीय पोषण अभियानअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षा प्राजक्ता ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे बुधवारी जिल्हास्तरीय राष्ट्रीय पोषण अभियानअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षा प्राजक्ता कोरे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांचे आरोग्य सुधारणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबर कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी त्यांच्या मातांना बालकांचे आहार व आरोग्य याबाबत सक्षम करण्याच्या सूचना अधिकारी, अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत.
महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीस सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
चौकट
गंभीर आजारी बालकांचा शोध घ्या
अंगणवाडीतील सर्व सेविका यांनी शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे अचूक वजन व उंची घेऊन त्यांचे श्रेणीकरण कसे करावे, या संदर्भात प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार या पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी सेविकांनी बालकांचे सॅम आणि गंभीर आजारी असलेल्या बालकांचा शोध घ्यावा व त्यांना संदर्भ सेवा तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्राजक्ता कोरे यांनी दिल्या.