हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:01 PM2018-12-03T23:01:16+5:302018-12-03T23:01:32+5:30

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर शासनाने तीन वर्षाने अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची नियुक्ती केली होती

 Engineer changed Sangli district in two days | हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा

हजर होताच अभियंत्याची दोन दिवसात पुन्हा बदली सांगली जिल्हा परिषदेमध्ये उलट-सुलट चर्चा

Next
ठळक मुद्देया विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या सिंचन योजना जिल्ह्यात राबविल्या जात असतानाही,

सांगली : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर शासनाने तीन वर्षाने अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची नियुक्ती केली होती. कोळी हे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा पदभार घेतल्यानंतर दोन दिवसातच त्यांची उस्मानाबाद येथे बदली झाली आहे.

मागील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याचा पदभार देण्यावरुन वादंग झाले होते. सक्षम अधिकारी या विभागाकडे नसल्यामुळे जिल्ह्यातील कामकाजावरही त्याचा परिणाम होत होता. अखेर शासनाने चार दिवसांपासून अंबरनाथ (जि. ठाणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांची सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे बदली केली होती.

परंतु, कोळी सध्या सांगलीत हजर होण्यास तयार नसल्याची जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चर्चा होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजर होण्याची सूचना दिल्यामुळे कोळी यांनी पदभार स्वीकारला आहे. पण, ते अन्यत्र बदलीच्या तयारीत होते. त्यांना महापालिकेकडे बदली हवी होती. प्रत्यक्षात उस्मानाबाद जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांच्या बदलीची जिल्हा परिषदेत उलट-सुलट चर्चा रंगली आहे. काही असले तरी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कार्यकारी अभियंता पद पुन्हा रिक्त झाले आहे.

तीन वर्षे पद रिक्त
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सादिगले यांची बदली झाल्यापासून तीन वर्षे कार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. या विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या सिंचन योजना जिल्ह्यात राबविल्या जात असतानाही, तीन वर्षात शासनाने नियमित पद भरले नाही. तीन वर्षे उपकार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयाकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता.

Web Title:  Engineer changed Sangli district in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.