Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:14 PM2019-10-07T14:14:38+5:302019-10-07T14:16:45+5:30

निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Enlightenment to increase voter turnout | Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम

Next
ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधनमॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम

सांगली : निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मतदानाचा दिवस म्हणजे सुटी हा समज अनेकांमध्ये असतो. यावर पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने मतदान रविवारी न घेता अन्य दिवशी घेण्यास सुरुवात केली. तरीही अनेकवेळा घसरत चाललेला मतदानाचा टक्का चिंतेचा विषय ठरला होता. मात्र, थेट मतदारांपर्यंत पोहोचत लोकशाही बळकटीकरणात एक मत किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी स्वीप (सिस्टीमॅटिक व्होटर एनरोल्मेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रोग्रॅम) उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चार स्तरावर होत असलेल्या या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्रणेची मतदारांना माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर चुनावी पाठशाला उपक्रमात मतदारांच्या शंकांचे निरसन करत त्यांचे मतदान यादीतील नाव, भाग याची माहिती देण्यात येत आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार सहाय केंद्र, तर प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती फोरम सुरू करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकारात शहरातील ज्या भागात नेहमीच कमी मतदान होते, त्याठिकाणी जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गलाई बांधव व्यवसायासाठी देशभर वास्तव्यास आहेत. त्यांनी मतदान करावे यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. तरुण मतदारांनीही मतदान करावे, यासाठी कॉलेजमध्ये उपक्रम सुरू करण्यात येत असून, प्रत्येक  कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर कार्यरत आहेत. शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बैठक, मुलांकडून पत्रलेखन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Web Title: Enlightenment to increase voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.