कोळी समाजातर्फे पुरस्कार सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:14+5:302021-02-26T04:38:14+5:30
सांगली : येथील महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध पुरस्कार वितरण सोहळा व वधू-वर मेळावा उत्साहात झाला. कोरोना काळात उत्कृष्ट ...
सांगली : येथील महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध पुरस्कार वितरण सोहळा व वधू-वर मेळावा उत्साहात झाला. कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या अन्य समाजातील मान्यवरांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
सांगलीच्या जिल्हा नगरवाचनालयातील उद्योगरत्न वेलणकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, रयत क्रांती संघटना युवा कार्याध्यक्ष सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरजेचे दुय्यम उपनिबंधक श्रीराम कोळी व
सांगली पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विलास कोळी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. आदर्श कोरोना योद्धा पुरस्कार (सांगली) चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना देण्यात आला. कोळी समाज भूषण पुरस्कार पट्टणकोडोली येथील सुरेश कोळी यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ. पुंडलिक पन्हाळे
(कासेगाव) यांना प्रदान करण्यात आला. प्रा. बी. एस. गुरव, आर. जी. कोळी, अरुण कोळी, बाबासाहेब शिरगुरे, व्ही. डी. कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. श्रीकांत पन्हाळे (सातारा) व मायाराणी गायकवाड (मुंबई) यांचा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सत्कार करण्यात आला. गायत्री पवार यांनी प्रबोधन केले. ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. पंढरीनाथ गायकवाड, गुंडा कोळी, विजय कुर्ले, अभिषेक सूर्यवंशी, संजय कोळी, उदय कोळी, स्वप्निल
सूर्यवंशी, चिंतामणी कोळी, गजानन कोळी, नागेश कोळी, डॉ. नवनाथ कोळी उपस्थित होते. विजय कडणे, व्ही. डी. कोळी यांनी सूत्रसंचालन केले. सहदेव
कोळी यांनी आभार मानले.