उद्योजकता केंद्राने मिळवून दिल्या दीड हजार तरुणांना नोकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:26+5:302021-09-07T04:31:26+5:30

संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींनी स्वयंरोजगार ...

The Entrepreneurship Center provided jobs to one and a half thousand youth | उद्योजकता केंद्राने मिळवून दिल्या दीड हजार तरुणांना नोकऱ्या

उद्योजकता केंद्राने मिळवून दिल्या दीड हजार तरुणांना नोकऱ्या

Next

संतोष भिसे-

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींनी स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. जानेवारीपासूनच्या आठ महिन्यांत ६ हजार ६७३ तरुणांनी केंद्राच्या सेवेचा आधार घेतला आहे.

विशेष बाब म्हणजे यामध्ये तरुणांची संख्या जास्त म्हणजे ५ हजार ८७ आहे. युवतींची नोंदणी मात्र खूपच कमी म्हणजे १ हजार ५८६ इतकी आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी या विभागातर्फे सातत्याने मोहीम राबविली जाते. गरजू तरुण आणि रोजगार देणाऱ्या संस्था यांच्यात समन्वय घडविल्याने गेल्या आठ महिन्यांत दीड हजार तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यात यश आले आहे. लॉकडाऊन काळात या तरुणांना हा मोठा आधार ठरला आहे. याच कालावधीत तरुणांना कौशल्यक्षम बनविण्यासाठी अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. याअंतर्गत विविध खासगी रुग्णालयांत तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. रुग्णसहाय्यक, जनरल ड्युटी असिस्टन्ट आदींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला जात आहे.

बॉक्स

दीड हजारजणांना मिळाला रोजगार

- जानेवारीपासूनच्या आठ महिन्यांत १ हजार ५०३ तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्यात केंद्राला यश आले आहे.

- यामध्ये १ हजार २६६ तरुण आणि २३७ तरुणींचा समावेश आहे. रुग्णालये, कारखाने, शिक्षण संस्था आदींमध्ये ते रुजू झाले आहेत.

बॉक्स

पुणे-मुंबईकडेही पुन्हा धाव

- लॉकडाऊन शिथिल होताच अनेक तरुण-तरुणींनी पुन्हा पुणे-मुंबईची वाट धरली आहे.

- उद्योग, आयटी कंपन्यांमधील तरुणांना ब्रेक मिळाला होता, त्यांचे रोजगार पूर्ववत झाले आहेत.

- कोरोना व लॉकडाऊनमुळे नोकऱ्या सोडून गावाकडे गेलेले परप्रांतीय तरुणही जिल्ह्यात परतले आहेत.

कोट

केंद्रात नोंदणीसाठी बेरोजगारांचा ओढा वाढत आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना स्वबळावर उभे करण्याचाही प्रयत्न असतो. नोकरी व स्वयंरोजगाराच्या इच्छुकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित केली जातात. कर्जासाठी बॅंकेकडे प्रस्ताव कसे दाखल करावेत, याचीही माहिती दिली जाते. अैाद्योगिक संस्थांकडून वेळोवेळी त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती घेऊन तरुणांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला जातो.

- ज. बा. करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

ग्राफ

जानेवारी - पुरुष १३७२, महिला २७३

फेब्रुवारी - पुरुष ६५४, महिला २०६

मार्च - पुरुष ६५९, महिला ३११

एप्रिल - पुरुष ५५६ महिला ८४

मे - पुरुष ३०२, महिला ९९

जून - ४१३, महिला ११९

जुलै - ५९१, महिला २३०

ऑगस्ट पुरुष ५४०, महिला २६४

दुसरा ग्राफ

नोकरीस लागलेल्यांची संख्या

जानेवारी ७१९, फेब्रुवारी ९३, मार्च ७५, एप्रिल १८१, मे २०६, जून ११३, जुलै ६३, ऑगस्ट ५३

Web Title: The Entrepreneurship Center provided jobs to one and a half thousand youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.