आष्टा, पलूस, कडेगावमध्ये पर्यावरण दिनी वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:26+5:302021-06-06T04:19:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पर्यावरण दिनानिमित्त मराठा ऑर्गनायझेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. आष्टा येथे जिजामाता बालक मंदिर, हनुमाननगर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पर्यावरण दिनानिमित्त मराठा ऑर्गनायझेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. आष्टा येथे जिजामाता बालक मंदिर, हनुमाननगर, रामनगर, दत्त वसाहत, गांधीनगर तसेच कडेगाव, पलूस, वाळवा आदी ठिकाणी झाडे लावण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख अजय शिंदे यांनी केले. आष्टा येथे नगराध्यक्ष स्नेहा माळी यांच्याहस्ते, तर जिजामाता बालक मंदिरात शिक्षक दत्तात्रय डफळे यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. नगराध्यक्ष माळी म्हणाल्या की, विवाहासाठी शुभमंगल वृक्ष, कौतुक सोहळ्यासाठी आनंद वृक्ष, माहेरवाशिणीसाठी माहेरची झाडी आणि मृत व्यक्तींच्या स्मृतीसाठी स्मृती वृक्ष लावण्यात यावेत.
उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, प्रभाकर जाधव, निवृत्त प्राचार्य बाबासाहेब सोलनकर, प्राचार्य ज्योती शेटे, मेघा मुळीक, सुजाता पठाने, जिल्हाध्यक्ष श्रीधर देशमुख, उपाध्यक्ष किरण देशमुख, सचिव अमोल देशमुख, कडेगाव तालुकाध्यक्ष खाशाबा यादव, पलूस तालुकाध्यक्ष रोहित लाड, श्रद्धा लांडे, वैशाली डफळे आदी उपस्थित होते.